---Advertisement---

डिविलियर्सने पुन्हा दुखावली RCBच्या चाहत्यांची मने! म्हणाला, ‘हा’ संघच बनणार IPL 2023चा चॅम्पियन

AB-De-Villiers
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात होऊन आता आठवडा उलटला आहे. यातील प्रत्येक संघाने आता 1 ते 2 सामने खेळले आहेत. आतापर्यंत झालेला प्रत्येक सामना रोमांचक होता. तसेच, आगामी सामन्यातही हीच रोमांचकता पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आयपीएलचे एकही विजेतेपद न जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल 2023 स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. आता आरसीबी संघ गुरुवारी (दि. 6 एप्रिल) दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे.

Paisa-Pani

अशातच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) माजी खेळाडू एबी डिविलियर्स (AB De Villiers) याने भविष्यवाणी करत आयपीएलच्या सुरुवातीलाच आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या विजेत्या संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, त्याने स्वत:च्या आरसीबी संघाचेच नाव घेतले नाहीये.

काय म्हणाला डिविलियर्स?
एबी डिविलियर्स म्हणाला की, “आयपीएलमध्ये चॅम्पियन कोण बनेल, हे सांगणे खूपच कठीण आहे. काही वेळापूर्वी आयपीएल लिलावादरम्यान मी म्हणालो होतो की, गुजरात टायटन्स संघ सलग दोनवेळा चॅम्पियन बनण्याचा दम राखतो. हेच मी आताही सांगत आहे. मात्र, माझी मनापासून इच्छा आहे की, आरसीबीने जिंकावे. मागील हंगामात आमच्याकडे चांगला संघ होता. त्यांच्याकडे चांगली ताकद होती. आशा आहे की, आरसीबी यावेळी आपली दावेदारी ठोकेल.”

विराटच्या फॉर्मवरही भाष्य
विराट कोहली (Virat Kohli) याच्या फॉर्मविषयी बोलताना डिविलियर्स म्हणाला की, “मागील हंगामात कर्णधारपद सोडल्यामुळे विराट कोहलीला चांगलाच आराम मिळाला आहे. तो एक शानदार कर्णधार होता. आयपीएलमध्ये त्याने दीर्घ काळ संघाचे प्रतिनिधित्व केले. कधी-कधी तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी किंवा स्वत:साठी वेळ काढू इच्छिता. मला वाटते की, आधीप्रमाणे त्याच्यात काहीच बदल नाहीये, तो आधीसारखाच आहे.”

विराट शानदार फॉर्मात
विराट कोहली याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्याने यादरम्यान 49 चेंडूत नाबाद 82 धावा चोपल्या होत्या. या धावा करताना त्याने 5 षटकार आणि 6 चौकारांचा पाऊसही पाडला होता. दुसरीकडे, संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) यानेही आपला दम दाखवून दिला होता. फाफने 43 चेंडूत 73 धावांची वादळी खेळी साकारली होती. त्याच्या या खेळीत 5 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. आता कोलकाताविरुद्धही हे खेळाडू दमदार कामगिरी करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (not RCB MI or CSK mr 360 ab de villiers predict gujarat titans as ipl 2023 champion)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आजचा सामना…’, केकेआर-आरसीबी सामन्याच्या काही तासांपूर्वीच भारताच्या माजी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
संधी असूनही अश्विनकडून पंजाबच्या कर्णधाराला जीवदान, पण कॅमेऱ्यात कैद झाली बटलरची रिऍक्शन; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---