लंडन। विम्बल्डन २०२१ स्पर्धेत शुक्रवारी(९ जुलै) पुरुष एकेरीची उपांत्य फेरी पार पडली. या फेरीत अव्वल मानांकित नोवाक जोकोविचने १० व्या मानांकित डेनिस शापोवालोव्हचा पराभव केला, तर इटलीच्या मतेओ बेरेटिनीने २४ वर्षीय हबर्ट हुरकाचचा पराभव केला. त्यामुळे आता रविवारी (११ जुलै) जोकोविच आणि बेरेटिनी अंतिम फेरीत आमने-सामने येतील.
जोकोविचला विक्रमी २० वे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी
नोवाक जोकोविचने कारकिर्दीत सातव्यांदा विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली आहे. यावेळी तो विक्रमी २० वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या नावावर सध्या १९ ग्रँडस्लॅम विजेतीपदं आहे. तसेच सध्या पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या टेनिसपटूंमध्ये त्याच्या पुढे केवळ राफेल नदाल आणि रॉजर फेडरर आहे. नदाल आणि फेडरर यांनी प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.
जोकोविचने शुक्रवारी उपांत्य फेरीत कॅनडाच्या शापोवालोव्हला २ तास ४४ मिनिटांच्या लढतीत ७-६ (३), ७-५,७-५ अशा सलग तीन सेटमध्ये पराभूत केले. सामन्यानंतर २२ वर्षीय शापोवालोव्हने जोकोविचला दिलेल्या तगड्या लढतीबद्दल प्रेक्षकांनी त्याचे टाळ्या वाजवून कौतुक केले. तसेच जोकोविचनेही त्याचे कौतुक केले.
A sterling effort in just his 10th singles match at #Wimbledon
No doubt we'll be seeing plenty more of @denis_shapo on this stage in the future… pic.twitter.com/TnMlEIBAtf
— Wimbledon (@Wimbledon) July 9, 2021
उपांत्य फेरीच्या सामन्यात विजय मिळवल्याने जोकोविचची ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची ही ३० वेळ ठरली आहे. त्यामुळे ३० किंवा त्यापेक्षा अधिकवेळा ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात पोहचणारा तो दुसराच टेनिसपटू ठरला आहे. यापूर्वी रॉजर फेडरर ३१ वेळा ग्रँडस्लॅमचा अंतिम सामना खेळला आहे. तर राफेल नदाल २८ वेळा ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात खेळला आहे.
#Wimbledon title No.6 is in reach.
Defending champion @DjokerNole is into his seventh final at The Championships with a straight sets victory over Denis Shapovalov pic.twitter.com/QpyX7Ho0eZ
— Wimbledon (@Wimbledon) July 9, 2021
बेरेटिनी पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत
सातव्या मानांकित बेरेटिनीने शुक्रवारी पोलंडच्या हबर्ट हुरकाच याला २ तास ३७ मिनिटे चाललेल्या उपांत्य सामन्यात पराभूत करत कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. बेरेटिनीने हबर्टविरुद्ध ६-३,६-०,६-७(३), ६-४ अशा चार सेटमध्ये विजय मिळवला. चारही सेटमध्ये आपली सर्विस बेरेटिनीने गमावली नाही. तसेच त्याने २ ब्रेक पाँइंटही वाचवले. (Novak Djokovic will play Berrettini in the Wimbledon final)
Into the history books 🇮🇹@MattBerrettini becomes the first Italian player to reach a singles final at #Wimbledon, beating Hubert Hurkacz 6-3, 6-0, 6-7(3), 6-4 pic.twitter.com/NkKbXbuaQC
— Wimbledon (@Wimbledon) July 9, 2021
बेरेटिनी हा तब्बल ४५ वर्षांनंतर ग्रँडस्लॅमच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत खेळणारा इटलीचा पहिला टेनिसपटू ठरला आहे. यापूर्वी १९७६ साली अॅड्रिआनो पानट्टा हे फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात खेळले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
रॉजर फेडररचे विम्बल्डनमधील आव्हान संपुष्टात; तब्बल १९ वर्षांनंतर झाला ‘असा’ दुर्दैवी पराभव
Wimbledon 2021: सानिया-बोपन्नाने नोंदवला ऐतिहासिक विजय, ५३ वर्षांत पहिल्यांदाच झालं असं
सानियाचे ‘ग्रँड कमबॅक’! विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत मिळवला विजय, मुलाने वाढविला उत्साह