सर्बियाचा दिग्गज टेनीसपटून नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल गाठली आहे. त्याने अमेरिकेच्या टॉमी पॉलला मेलबर्न पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात 7-5, 6-1, 6-2 असे पराभूत केले. याबरोबर जोकोविचने तब्बल 33व्यांदा ग्रॅंडस्लॅम स्पर्धेची पुरुष एकेरीत अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना स्टिफानोस त्सित्सिपासविरुद्ध होत असून ते तेराव्यांदा आमने-सामने येणार आहेत.
ऑस्ट्रेलियन ओपनमधील कामगिरी
35 वर्षाय नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा यापुर्वी ९वेळा जिंकली आहे. तर रविवारी अर्थात 29 जानेवारी रोजी तो ही स्पर्धा विक्रमी 10व्यांदा जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियन ओपन सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावावर आहे. 2008 साली वयाच्या 19व्या वर्षी तो पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकला होता. ते त्याचे करियरमधले पहिलेच ग्रॅंडस्लॅम होते. 2005 पासून जोकोविचने 18वेळा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेतला असून तब्बल 10 वेळा फायनल गाठली आहे तर 3वेळा तो उपांत्यपुर्व फेरीतून बाहेर गेला आहे. तो ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत जाणारा आतापर्यंत चौथा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. आजपर्यंत जोकोविच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कधीही पराभूत झालेला नाही. जोकोविचने आतापर्यंत ऑस्ट्रेलियन ओपन 9, फ्रेंच ओपन 2, विंब्लडन 7 तर अमेरिकन ओपन 3 अशी एकूण 21 विजेतेपद जिंकली आहेत. 2019पासून जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनचा एकही सामना गमावला नाही. त्याने 2022मध्ये स्पर्धेत भाग घेतला नव्हता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सलग 27 सामने जिंकण्याचा पराक्रम त्याने केला आहे.
नदालच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी-
जोकर नावाने प्रसिद्ध असलेल्या जोकोविचला यावेळी स्पेनच्या राफेल नदालच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. नदालने पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला आहे. नदालने 22वेळा पुरुष एकेरीत ग्रॅंडस्लॅम विजेतेपद मिळवले आहे तर सध्या जोकोविचच्या नावावर 21 विजेतेपदं आहेत. नदाल या स्पर्धेत दुसऱ्या फेरीतूनच बाहेर पडला आहे. त्यामुळे नदालच्या विक्रमाची बरोबरी करण्याची मोठी संधी जोकोविचकडे आहे.
सर्वाधिक वेळा गाठली ग्रॅंडस्लॅमची अंतिम फेरी-
जोकोविचने तब्बल 33वेळा ग्रॅंडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. ग्रॅंडस्लॅम स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, विंब्लडन, फ्रेंच ओपन अर्थात रोला गॅरोस व अमेरिकन ओपनचा समावेश होतो. या चारही स्पर्धांंना मोठे ऐतिहासीक महत्त्व आहे. जोकोविच पाठोपाठ स्विझर्लंडचा महान टेनीसपटू रॉजर फेडररने 31 वेळा तर राफेल नदालने ३०वेळा ग्रॅंडस्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली आहे. फेडररने गेल्यावर्षी व्यावसायिक टेनीसमधून निवृत्तीची घोषणा केल्यामुळे आता सर्वाधिक विजेतेपदाच्या गेममध्ये नदाल व जोकोविच ही नावंच राहिली आहेत. (Novak Djokovic’s chance to set a big record, Rafael Nadal’s record in jeopardy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
निवडकर्त्याचा धक्कादायक खुलासा! ‘या’ कारणामुळे सरफराजला मिळत नाहीये टीम इंडियात संधी
Australian Open 2023: टॉमीला नमवत जोकोविचला मिळाले फायनलचे तिकीट, अंतिम सामन्यात स्तिस्तिपासला भिडणार