---Advertisement---

आता क्रिकेटमध्ये ‘बायो-बबल’ ऐवजी वापरला जाणार ‘हा’ शब्द?

On: शनिवार, मे 15, 2021 11:57 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ २ ते १४ जून दरम्यान २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत, त्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाने एक विशेष आवाहन केले आहे. वास्तविक, इंग्लंडने जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेदरम्यान ‘बायो-बबल’ हा शब्द वापरण्याऐवजी ‘टीम एन्व्हायरमेंट’ हा शब्द वापरण्याची विनंती केली आहे. ब्रिटिश माध्यमांच्या हवाल्यानुसार, बायो बबलशी संबंधित नकारात्मक गोष्टी दूर केल्या जातील आणि संघातील खेळाडूंना सुरक्षित व आरामदायक वाटेल, असा संघ व्यवस्थापनाचा विश्वास आहे.

प्रशिक्षकांनी केली मागणी
ब्रिटनमधील आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या ‘द गार्डियन’ च्या वृत्तानुसार इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी म्हटले आहे की, “भारताविरुद्ध मालिका खेळून आता दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्यानंतर खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी झाले. आयपीएलमधील खेळाडूंच्या अनुपस्थितीत आम्ही ही मालिका खेळण्यास मालिकेत ‘बायो-बबल’ या ऐवजी ‘टीम एन्व्हायरमेंट’ असा शब्द वापरण्याची मागणी करू. ही एक छोटीशी सुरुवात आहे मात्र आम्हाला आशा आहे की, यामुळे नक्कीच बदल घडेल.”

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला २ जूनपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होईल. त्यानंतर दुसरा कसोटी सामना बर्मिंघम येथे १० जूनपासून खेळवला जाईल. या मालिकेनंतर न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा सामना खेळेल.

या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता कमी
नुकतेच आयपीएल खेळून गेलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड देखील यासाठी इच्छुक नाही. सध्या हे सर्व खेळाडू विलगीकरणात असून, हे विलगीकरण या आठवड्याच्या अखेरीस संपन्न होईल. असे झाल्यास जोस बटलर, मोईन अली, सॅम करन व ख्रिस वोक्स हे खेळाडू या मालिकेला मूकतील.

महत्त्वाच्या बातम्या –

सेहवाग म्हणतो भारताच्या ‘या’ खेळाडूमध्ये दिसते युवा कायरन पोलार्डची झलक

“शोएब अख्तरने मला धमकी दिलेली”, रॉबिन उथप्पाने केला खळबळजनक दावा

ऑस्ट्रेलियन क्रिकेट वर्तुळात उडाली खळबळ! बॉल टेम्परिंग प्रकरणाची होऊ शकते पुन्हा चौकशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---