---Advertisement---

अबब! प्रो कबड्डी विजेत्या संघाची बक्षीस ऐकून व्हाल अवाक्

On: शुक्रवार, ऑक्टोबर 11, 2019 8:51 PM
---Advertisement---

ट्रान्सस्टॅडिया, अहमदाबादच्या इको एरेना येथे व्हिव्हो प्रो कबड्डी लीग सीझन ७ च्या ‘प्लेऑफस’ रसिकांना रोमांचक सामन्यासाठी तयार करणार आहे. वीवो प्रो कबड्डीने सातव्या सीजन साठी ८ कोटी रुपयांचे एकूण बक्षीसाची रक्कम जाहीर केली आहे.

व्हिव्हो प्रो कबड्डी सीझन ७ च्या एकूण बक्षिसेची ऑफर देण्यात आली आहे. जी मोठ्या लीग संघ आणि खेळाडू साठी आकर्षक बक्षिसे आहेत. प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या सर्व संघांना काही बक्षीस रकमेचे गौरविण्यात येणार आहे.

प्रो कबड्डी सीजन ७ च्या विजेत्या संघाला ३ कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला १.८० कोटी रुपये बक्षीस असणार आहे. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी ९० लाख रुपये तर पाचव्या व सहाव्या क्रमांकासाठी ४५ लाख रुपये देऊन गौरविण्यात येईल. बाकी रक्कम विविध वैयक्तिक पुरस्करांसाठी देण्यात येईल.

प्रो कबड्डी सीजन ७ च्या प्लेऑफ साठी सहा संघ पात्र ठरले आहेत. १४ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान प्लेऑफसचे सामने होणार आहेत. दबंग दिल्ली के सी, बंगाल वारियर्स, यु मुंबा, हरियाना स्टीलर्स, बेंगळुरू बुल्स व यूपी योद्धा हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.

पहिल्या सहा संघांसाठी बक्षीस रक्कम:

विजेता – ३ कोटी रुपये

उपविजेता – १.८० कोटी रुपये

तिसरा क्रमांक- ९० लाख रुपये

चौथा क्रमांक- ९० लाख रुपये

पाचवा क्रमांक- ४५ लाख रुपये

सहावा क्रमांक- ४५ लाख रुपये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment