मुंबई। आयपीएलचा 11 वा मोसम आता अखेरच्या टप्यात आली आहे. मंगळवारी, 22 मेला आयपीएल प्ले-आॅफला सुरवात झाली.
प्ले-आॅफमधील क्वालिफायर 1 चा सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्याच रंगला. या सामन्यात चेन्नईने २ विकेट्सने विजय मिळवला.
कर्णधार धोनीने ९ आयपीएलमध्ये चेन्नईचं नेतृत्व केलं असुन तब्बल ७ वेळ चेन्नईला अंतिम फेरीत नेलं आहे.
यावर्षी चेन्नईच्या क्वाॅडनमध्ये २४ खेळाडू आहेत. त्यातील ५ खेळाडूंना एकही सामन्यात संधी मिळाली नाही. तर ४ ते ५ खेळाडू केवळ १-२ सामने खेळले आहेत.
असे असताना तब्बल ८ खेळाडूंना या स्पर्धेत एकदातरी सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. त्यात ड्वेन ब्रावो, सॅम बिलिंग्ज, शेन वाॅटसन, अंबाती रायडू, कर्णधार एमएस धोनी, रविंद्र जडेजा, लुंगी निगडी आणि फाफ डुप्लेसी यांचा समावेश आहे.
२०१८ आयपीएलमध्ये @ChennaiIPLचे सामनावीर पुरस्कार मिळवणारे खेळाडू
ब्रावो
बिलिंग्ज
वाॅटसन
रायडू
धोनी
वाॅटसन
जडेजा
रायडू
लुंगी निगडी
फाफ डुप्लेसी#म #मराठी @MarathiBrain @MarathiRT @Mazi_Marathi @Maha_Sports @BeyondMarathi @kridajagat— Sharad Bodage (@SharadBodage) May 23, 2018
यातील वाॅटसन आणि रायडू यांना सामनावीर पुरस्कार दोन वेळा मिळाला आहे. प्ले-आॅफमध्ये प्रवेश केलेल्या राजस्थान, कोलकाता आणि हैद्राबाद संघांच्या खेळाडूंना हा मान प्रत्येकी ४ वेळा मिळाला आहे.
म्हणजेच १५ सामन्यात तब्बल १०वेळा चेन्नईच्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.
प्ले-आॅफपुर्वीच स्पर्धेतुन बाहेर गेलेल्या मुंबई आणि दिल्लीच्या खेळाडूंनी मात्र हा मान प्रत्येकी ५वेळा मिळवला आहे.
२०१८ @IPL मध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार या संघातील खेळाडूंना मिळाले
८- चेन्नई
५- दिल्ली
५- मुंबई
४- पंजाब
४- कोलकाता
४- राजस्थान
४- हैद्राबाद
३- बेंगलोर#म #मराठी @MarathiBrain @MarathiRT @Mazi_Marathi @Maha_Sports @BeyondMarathi @kridajagat— Sharad Bodage (@SharadBodage) May 23, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनी धोनी हैं ! हा फोटो सांगतो, धोनी का स्पेशल आहे?
–चेन्नई आणि वानखेडेचं खास नातं, जुळून आला खास योगायोग
–एकदा नाही तर तब्बल ११ आयपीएल रैना ठरला विराटला सरस!
–एकदा १०० तर दुसऱ्यांदा ०, या खेळाडूबरोबर आयपीएलमध्ये झाला गजब विक्रम
–कॅप्टन कूल एमएस धोनीचा नाद करायचा नायं !