भारतीय संघ २०२३-२०२७च्या पुढील फ्युचर टूर प्रोग्राम (एफटीपी) सायकलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोनदा कसोटी मालिका खेळणार आहे. यामध्ये प्रत्येक मालिकेतील कसोटी सामन्यांची संख्या सध्याच्या चारवरून पाच झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया 1992 नंतर प्रथमच पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहेत. सध्याचा आयसीसी एफटीपी २०१८ ते २०१३ आहे जो पुरुषांच्या ५० षटकांच्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाने संपेल. जो पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाईल.
बर्मिंगहॅम येथे २५ आणि २६ जुलै रोजी आयसीसीच्या वार्षिक बैठकीच्या जवळ, संपूर्ण एफटीपी अधिकृतपणे या महिन्याच्या अखेरीस घोषित होण्याची शक्यता आहे. अलिकडच्या वर्षांत भारताविरुद्धची मालिका ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांसाठी एक आकर्षण ठरली आहे, तर ऑस्ट्रेलियातील शेवटच्या चार सामन्यांच्या मालिकेने आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेटला मोठा दिलासा दिला आहे.
क्रिकइन्फो मधील अहवालानुसार, एफटीपीच्या अंतिम मसुद्यात भारत डिसेंबर आणि जानेवारी २०२४-२५ मध्ये पाच कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ २०२७ मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. भारताला इंग्लंडविरुद्ध दोन ५ कसोटी सामन्यांची मालिकाही खेळायची आहे. यासाठी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.
एफटीपीच्या मसुद्यानुसार भारताला ३८ कसोटी खेळायच्या आहेत. इंग्लंडचा संघ ४२ कसोटी सामने खेळणार असून ऑस्ट्रेलियाचा संघ २०२३ ते २०२७ दरम्यान ४१ कसोटी सामने खेळणार आहे. यादरम्यान बांगलादेश ३४ आणि न्यूझीलंड ३२ कसोटी सामने खेळणार आहे. येथे फक्त पाच संघ ३० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बुमराहच्या विक्रमाला पडणार खिंडार? आफ्रिदीचा होणारा जावई पोहचलाय अगदी जवळ
बांग्लादेशने वेस्ट इंडिजला दिलाय क्लीन स्विप, ‘या’ खेळाडूने वेधले जगाचे लक्ष
तू चुकतोय; कर्णधार रोहित शर्माच्या ‘या’ निर्णयावर माजी भारतीय क्रिकेटरने मुरडले नाक