विश्वचषक 2023 मधील 11वा सामना शुक्रवारी (13 ऑक्टोबर) न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाणार आहे. उभय संघांतील ही लढत चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईमध्ये खेळला जाणारा हा विश्वचषख 2023मधील दुसरा सामना आहे. तर न्यूझीलंड आणि बांगलादेश आपला तिसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतील.
चेपॉक स्टेडियमवर न्यूझीलंड आणि बांगलादेशची कामगिरी
शुक्रवारी (13 ऑक्टोबर) बांगलादेश आणि न्यूझीलंड (Bangladesh vs New Zealand) यांच्यातील हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. तत्पूर्वी दुपारी 1.30 वाजता सामन्याची नाणेफेक पार पडेल. न्यूझीलंडने चेपॉकवर (Chepauk Cricket Stadium) आतापर्यंत चार वनडे सामने खेळले असून त्यातील एक सामना जिंकला आहे. दोन सामन्यात न्यूझीलंडला पराभव स्वीकारावा लागला असून एक सामना अनिकाली राहिला. दुसरीकडे बांगलादेशने चेपॉकवर आतापर्यंत फक्त एक वनडे सामना खेळला, ज्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
विश्वचषकातील आमने सामने आकडेवारी
वनडे विश्चषकात न्यूझीलंड आणि बांगलादेश संघ आतापर्यंत एकूण पाच वेळा आमने सामने आले आहेत. यातील एकही सामना बांगलादेशला जिंकता आला नाहीये. पाच पैकी पाचही सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. यावर्षी उभय संघात विश्वचषकात सहाव्यांदा लढत होईल. या सामन्यात कोण बाजी मारणार, हे पाहण्यासारखे असेल. एकंदरीत विचार केला, तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 40 सामने खेळले गेले असून न्यूझीलंडने यापैकी 31 सामने जिंकले आहेत. बांगलादेशला 10 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे, तर एक सामना अनिकाली राहिला.
खेळपट्टी
चेपॉकची खेळपट्टी नेहमीच फिरकी गोलंदाजांना मदत करणारी राहिली आहे. अशात न्यूजीलंड आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात देखील फिरकीपटू निर्णायक भूमिका पार पाडू शकतात. दोन्ही संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये उत्तम फिरकीपटूंना निवडण्याचा प्रयत्न करेल. तसेच नाणेफेक जिंकणाऱ्या संघासाठी प्रथम गोलंदाजीचा निर्णय फायद्याच्या ठरू शकतो.
हवामान
माहितीनुसार शुक्रवारी चेन्नईमधील वातावरणात सूर्याचा प्रभाव पाहायला मिळू शकतो. सोबतच काहीसे ढगाळ वातापरण देखील पाहायला मिळू शकते. साधारणतः 33 अंश सेल्सियसच्या आसपास तापमान सांगितले जात आहे. सायंकाळी हेच तापमान कमी होऊन 28 अंश सेल्सियसपर्यंत येईल.
(New Zealand-Bangladesh will clash for the sixth time in the World Cup, know the performance of both teams)
विश्वचषकासाठी निवडलेले संघ
न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल तरुण.
बांगलादेश – शकीब अल हसन (कर्णधार), लिटन कुमेर दास, तन्झिद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (उपकर्णधार), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराझ, नसूम अहमद, शाक मेहेदी हसन, तस्किन रहमान, मुस्तफीन अहमद, हसन महमूद, शोरीफुल इस्लाम, तन्झीम हसन साकीब.
महत्वाच्या बातम्या –
तिसऱ्या वर्ल्डकप मॅचमध्ये भारत-पाकिस्तान आमने सामने, जाणून घ्या कुणाचे पारडे जड
विश्वचषकात विजयाचे खाते खोलणे ऑस्ट्रेलियासाठी कठीण! डी कॉकमुळे दक्षिण आफ्रिकेने उभा केला धावांचा डोंगर