हॅमिल्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा वनडे सामना उद्या 31 जानेवारीपासून हॅमिल्टन येथे सुरु होत आहे. भारतीय संघ या मालिकेत 3-0 असा विजयी आघाडीवर आहे.
हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर हा सामना होणार आहे. हा सामना जिंकल्यास भारत 52 वर्षांमध्ये प्रथमच न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध 4-0 असा मोठा विजय मिळवण्याचा पराक्रम करू शकतो.
याआधी 1967-68मध्ये भारताने प्रथमच न्यूझीलंड दौरा केला होता. यामध्ये भारताने मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली 4 सामन्यांची कसोटी मालिका 3-1ने जिंकली होती. तर 2008-09मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 5 सामन्यांची वन-डे मालिका 3-1ने जिंकली होती.
त्यातच हे मैदान भारतासाठी तेवढे भाग्यवान ठरले नसून उद्याच्या सामन्यात भारताची कसोटीच लागणार आहे. येथे भारताने आतापर्यंत 9 वन-डे सामने खेळले आहे. त्यातील 3 सामन्यातच भारत विजयी ठरला तर 6 सामन्यांत पराभव स्विकारावा लागला आहे.
त्याचबरोबर या मैदानावर भारताने न्यूझीलंड विरुद्ध 5 सामने खेळले आहेत. यातील एकाच सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे.
2008-09मध्ये भारताने या मैदानावर झालेला न्यूझीलंड विरुद्धचा चौथा वन-डे सामना डकवर्थ लुईसच्या नियमाने 84 धावांनी जिंकला होता. तर 2014च्या न्यूझीलंड दौऱ्यात झालेले दोन्ही सामने भारताने गमावले होते.
उद्याचा सामना भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मासाठी खास असणार आहे. हा त्याचा 200वा वन-डे सामना असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनीच्या दुखापतीबद्दलची ताजी अपडेट, वनडे समावेशाबद्दल झाला मोठा निर्णय
–चौथ्या वनडेसाठी टीम इंडियात होऊ शकतात हे २ मोठे बदल
–रोहितने जर ही गोष्ट केली तर ठरणार सर्वात लकी भारतीय