भारत आणि न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना डकवर्थ लुईस नियमानुसार बरोबरीत सुटला. यासह भारतीय संघाने 3 सामन्यांची टी20 मालिका 1-0ने जिंकली. या मालिकेत भारताचे अनेक खेळाडू चमकले, तर काही खेळाडू असे होते, ज्यांच्याकडून अपेक्षा केली, त्यांनीच निराश केले. त्या खेळाडूंमध्ये रिषभ पंत याचाही समावेश होतो. या मालिकेत सपशेल फ्लॉप ठरलेला रिषभ पंत ट्रोल होत आहे. त्याच्या खराब कामगिरीसाठी नेटकऱ्यांनी ट्विटरवरून त्याच्याबद्दल तिखट प्रतिक्रिया दिल्या.
खरं तर, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याला प्रतिभावान खेळाडू म्हटले जाते. तसेच, माजी खेळाडू त्याला एक्स फॅक्टर असेही म्हणतात. त्याने कसोटी आणि वनडेत ही गोष्टी स्पष्ट केली आहे, पण टी20 क्रिकेटमध्ये त्याच्याकडे निराशाजनक आकडेवारी आहे. तो मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. त्याचे खराब प्रदर्शन न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यातही पाहायला मिळाले.
या सामन्यात पंतला फक्त 11 धावा करता आल्या. त्यानंतर त्याने नेहमीप्रमाणे पव्हेलियनचा रस्ता धरला. यापूर्वी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यातही त्याला फक्त 6 धावाच करता आल्या होत्या. असे म्हटले जात होते की, सलामीला खेळवल्यानंतर तो चांगली कामगिरी करेल, पण शेवटच्या दोन सामन्यातही त्याची बॅट तळपलीच नाही.
आता त्याच्या या खराब प्रदर्शनानंतर चाहत्यांचाही पारा चांगलाच चढला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पंतला चांगलेच ट्रोल केले आहे.
एका युजरने म्हटले की, “टी20 सेटअपमधून एक्स-फॅक्टर रिषभ पंतला काढण्याची वेळ आली आहे.” दुसऱ्या एका युजरने म्हटले की, “रिषभ पंतला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून बाहेर काढले पाहिजे, त्याला फक्त कसोटीसाठीच ठेवा.”
Time to DROP the X Factor Rishabh Pant from T20 Set up….
Enough is Enough @BCCI @JayShah#crickettwitter #NZvINDonPrime #SportsYaari
— Dheeraj Singh (@Dheerajsingh_) November 22, 2022
@RishabhPant17 should be dropped for T20I here after.. keep him only for Tests.@BCCI
— SRIDHARAN NARAYANAN (@Rishivanth) November 22, 2022
एका युजरने मीम्स शेअर करत लिहिले की, “संजू सॅमसनचे चाहते रिषभ पंतला पाहताना.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “रिषभ पंतला टी20मधून बाहेर काढा आणि त्याच्या जागी संजू सॅमसनला आणा.” आणखी एकाने लिहिले की, “अशाप्रकारे बीसीसीआय रिषभ पंत आम्हाला दाखवत आहे.”
https://twitter.com/SachinC66194563/status/1594995571223195648
Please enough chances for @RishabhPant17 …. Please leave him OUT of T20 scheme of things… @IamSanjuSamson deserves chances in opening or 3.
— Roy (@RoyCric) November 22, 2022
This is how @BCCI showing us @RishabhPant17 pant #NZvIND #Pant pic.twitter.com/1MnBzQjRno
— Vinod Kumar (@vinod_offl) November 22, 2022
पुरस्काराचे मानकरी
दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यातील शानदार खेळीसाठी मोहम्मद सिराज याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, संपूर्ण मालिकेत केलेल्या अफलातून फलंदाजीसाठी सूर्यकुमार यादव याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: इंग्लंडविरुद्ध दीडशतक झळकावणाऱ्या पठ्ठ्याने कच्चून मारला षटकार, वॉर्नरही पाहतच राहिला
पावसाची दादागिरी! सुपर ओव्हर न खेळवता भारत- न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना टाय