माऊंट मॉनगनुई| भारताचा न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वनडे सामना आज (28 जानेवारी) बे ओव्हल मैदानावर पार पडला असून भारताने हा सामना 7 विकेट्सने जिंकला आहे. तसेच 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने 77 चेंडूत 62 धावांची खेळी केली. यात त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. यावेळी त्याच्याबाबतीत एक नकोशी अशी गोष्ट घडली. ती म्हणजे वनडे कारकिर्दीत तो दुसऱ्यांदाच यष्टीचीत झाला असून ते ही एकाच तारखेला.
आजच्या सामन्यात रोहित मिशेल सॅन्टेनर याच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक टॉम लॅथमकडून यष्टीचीत झाला. तर 9 वर्षाआधी म्हणजेच 28 ऑगस्ट,2010ला तो दम्बुल्लामध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना सूरज रणदीपच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कुमार संगकाराकडून यष्टीचीत झाला होता.
त्याचबरोबर रोहितचे भारताकडून खेळताना वनडेमध्ये 215 षटकार पूर्ण झाले आहेत. त्यामुळे तो भारताकडून वनडेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत धोनीसह अव्वल क्रमांकावर आला आहे. धोनीनेही भारताकडून वनडेत 215 षटकार मारले आहेत.
कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिल्याने रोहित न्यूझीलंड विरुद्धच्या उर्वरित दोन वन-डे सामन्यात आणि 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताचे नेतृत्व करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाबाबत विराट कोहलीने केले हे मोठे वक्तव्य
–भारताविरुद्धच्या उर्वरित वनडे सामन्यांसाठी न्यूझीलंड संघात या दोन खेळाडूंचे झाले पुनरागमन
–कर्णधार कोहलीने रिकी पॉंटींगच्या या विक्रमाला दिला धक्का