---Advertisement---

टी२०तील तो मोठा पराक्रम करण्यासाठी युजवेंद्र चहलला मोठी संधी

On: मंगळवार, फेब्रुवारी 5, 2019 8:49 PM
---Advertisement---

वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात उद्यापासून(6 फेब्रुवारी) 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनमध्ये वेस्टपॅक स्टेडियमवर होणार आहे.

या मालिकेत भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये विकेट्सचे अर्धशतक पूर्ण करण्याची संधी आहे. त्याला 50 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 6 विकेट्सची आवश्यकता आहे. आतापर्यंत त्याने 27 टी20 सामन्यात 44 विकेट्स घेतल्या आहेत.

याचबरोबर चहल आर अश्विननंतर टी20मध्ये जलद 50 विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरेल. अश्विनने 46 सामन्यांमध्ये 52 विकेट्स घेतल्या आहेत. 

अश्विननंतर जसप्रीत बुमराह 48 विकेट्स घेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 40 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. 

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज-

52 – आर अश्विन (46 सामने)

48 – जसप्रीत बुमराह ( 40 सामने)

44 – युजवेंद्र चहल (27 सामने)

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्मा कर्णधार म्हणूनही विराट कोहलीला पडणार भारी!

टी२० मालिकेत टीम इंडियाला विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची संधी

एमएस धोनीला टी२०त तो महत्त्वाचा टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment