विश्वचषकातील न्यूझीलंडच्या दुसऱ्या सामन्यात विल यंग, रचिन रविंद्र आणि टॉम लॅथम यांनी आपल्या संघासाठी अर्धशतकी खेळी केली. सोबतच डॅरिल मिचेल यानेही संघासाठी महत्वपूर्ण धाला केल्या. नाणेफेक जिंकून नेदर्लंड्सने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. निर्धारित 50 षटकांमध्ये न्यूझीलंडने 7 विकेट्सच्या नुकसानावर 322 धावा कुटल्या. नेदर्लंड्सला विजायासाठी 323 धावांचे लक्ष्य मिळाले.
वनडे विश्वचषक 2023चे आयोजन भारता केले गेले आहे. विश्वचषकातील 6वा सामना सोमवारी (9 ऑक्टोबर) न्यूझीलंड आणि नेदर्लंड यांच्यात खेळला हैदराबादमध्ये खेळला गेला. नाणेफेक जिंकल्यानंतर नेदर्लंड्ससाठी या सामन्यात आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन आणि रोलेश वॅन डर मर्वी यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तसेच बास डी लीडे याला एक विकेट मिळाली. न्यूझीलंडसाठी सलामीवीर विल यंग याने 80 चेंडूत 70 धावांची सर्वोत्तम खेळी केली. तर शेवटच्या षटकांमध्ये मिचेल सँटनर याने बास डी लीडे याची चांगलीच कुटाई केली. शेवटच्या दोन चेंडूंवर सँटनरने षटकार मारले, ज्यापैकी एक चेंडू नो बॉल होता. परिणामी फिनिशरच्या रुपात आलेल्या सँटनरने संघासाठी 17 चेंडूत 211.76च्या सरासरीने 36 धावा जिंकल्या.
न्यूझीलंडसाठी तिसऱ्या क्रमांकावर आलेला रचिन रविंद्र विश्वचषक 2023 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध शतकी खेली केल्यानंतर रचिनने या सामन्यात 51 धावांचे योगदान दिले. चौथ्या क्रमांकावर आलेल्या डॅरिल मिचेल याने 48, तर कर्णधार टॉम लॅथम याने पाचव्या क्रमांकावर खेळताना 53 धावा केल्या. (NZ vs NED । A good hand from captain Tom Latham to help New Zealand reach 300)
विश्वचषक 2023 स्पर्धेतील सातव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
न्यूझीलंड – डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिशेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
नेदरलँड – विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, बास डी लीड, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), सीब्रँड एंजेलब्रेच, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, रायन क्लेन, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन
महत्वाच्या बातम्या –
सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये विराटचा Gold Medal ने सन्मान, पण का दिले पदक? पाहा व्हिडिओ
टॅलेंटेड रचिनचा टॉप फॉर्म कायम! सलग दुसऱ्या सामन्यात चोपली विरोधी गोलंदाजी, केल्या इतक्या धावा