न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी टी२० मालिकेपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. मालिकेपूर्वी सराव करत असताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला दुखपात झाली असून तो आगामी टी२० मालिकेतून बाहेर झाला आहे. याबद्दल बोलताना पाकिस्तान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी बाबरची दुखापत ही संघासाठी निश्चितच निराशाजनक आहे.
युनूस म्हणाले, “बाबर हा वर्तमान क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे व त्याची दुखापत संघासाठी निराशाजनक आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. इतर संघ त्याला घाबरतात.”
“हे दुर्भाग्यपूर्ण आहे की, महत्त्वाच्या मालिकेपूर्वी बाबर जखमी झाला. पण हा खेळाचाच एक भाग आहे. बाबरच्या दुखापतीमुळे संघातील इतर खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे.” असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
रविवारी (१३ डिसेंबर) सरावादरम्यान बाबरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार केले असता हे स्पष्ट झाले की, अंगठ्याला फ्रॅक्चर झाले असून बाबर आणखी १२ दिवस खेळू शकणार नाही. त्यामुळे तो न्यूझीलंड विरुद्ध १८ तारखेपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतून बाहेर झाला आहे.
बाबरपूर्वी इमाम उल हक याच्याही अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे तो न्यूझीलंड अ विरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात खेळला नव्हता. बाबरसोबतच डॉक्टर इमामच्या दुखापतीवरही लक्ष ठेवून आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मैदानात पुन्हा येणार ‘हिटमॅन’चं वादळ! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित होणार आज रवाना
काय सांगता! आजच्या दिवशी झाला होता कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिला सामना ‘टाय’
सावधान! ‘हे’ तीन खेळाडू भारतीय संघासाठी ठरू शकतात धोकादायक, ‘मास्टर ब्लास्टर’ची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख-