---Advertisement---

NZ vs PAK; न्यूझीलंडकडून पराभवानंतर कर्णधार रिझवान संतापला, म्हणाला “संथ फलंदाजी…..

On: गुरूवार, फेब्रुवारी 20, 2025 9:45 AM
---Advertisement---

मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली सुरुवात झाली नाही. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्यांना न्यूझीलंडकडून 60 धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने यजमान संघासमोर 321 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे पाकिस्तानला अपेक्षित नव्हते. या धावसंख्येचा पाठलाग करताना संघ 47.2 षटकांत 260 धावांवर सर्वबाद झाला. सामन्यानंतर, मोहम्मद रिझवानने फलंदाज आणि गोलंदाज दोघांवरही टीका केली आणि म्हटले की सामन्यादरम्यान त्यांच्या संघाने दोनदा गती गमावली, ज्यामुळे न्यूझीलंडला त्यांच्यावर वर्चस्व गाजवता आले.

सामन्यानंतर मोहम्मद रिझवान म्हणाला, “त्यांनी चांगले लक्ष्य दिले, आम्हाला हे अपेक्षित नव्हते. आम्हाला 260 च्या आसपास धावसंख्या अपेक्षित होती. आम्ही आमचे सर्वोत्तम दिले आणि सर्व रणनीती वापरल्या पण त्यांनी चांगला खेळ केला आणि चांगले लक्ष्य ठेवले. खेळपट्टीची स्थिती पाहतो, सुरुवातीला खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते पण जेव्हा विल यंग आणि लॅथम एकत्र फलंदाजी करत होते तेव्हा ते सोपे झाले. शेवटी, आम्ही लाहोरसारखीच चूक केली आणि त्यांनी एक चांगला लक्ष्य गाठला”.

321 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, बाबर आझमने पाकिस्तानला खूपच संथ सुरुवात दिली. त्याने या सामन्यात 90 चेंडूंचा सामना केला. ज्यात 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने फक्त 64 धावा केल्या. बाबरच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव आला आणि संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला.

आम्हाला फलंदाजीत चांगली सुरुवात मिळाली नाही, असे पाकिस्तानच्या कर्णधाराने सांगितले. “आम्ही दोनदा गती गमावली, एकदा डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करताना आणि नंतर पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करताना. हे आमच्यासाठी निराशाजनक आहे, आम्ही तो सामाना सामन्य सामन्यासारखा खेळलो. सामना आता संपला आहे आणि आम्हाला उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याची आशा आहे”.

हेही  वाचा-

वीजेसारखा झेल! किवी खेळाडूने घेतला अप्रतिम कैच, मोहम्मद रिझवानच्या बत्या गुल.! VIDEO
Champions Trophy; गट ‘अ’ मधील कडव्या स्पर्धेत पाकिस्तानच्या आशा मावळणार?
बाबर आझमची धीमी खेळी पाकिस्तानच्या पराभवाला जबाबदार, संथ अर्धशतकाच्या यादीत दुसरा क्रमांक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---