पाकिस्तानचा युवा फलंदाज हैदर अली म्हणणे आहे की न्यूझीलंड विरुद्ध होणार्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाज लाॅकी फर्ग्युसन याच्या अनुपस्थितने त्याच्या संघाच्या योजनेवर कोणता ही परिमाण होणार नाही.
नुकत्याच वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पार पडलेल्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन हा मालिकावीर ठरला होता. मात्र हा गोलंदाज पाकिस्तान विरुद्ध होणार्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. कारण त्याला पाठीमध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर झाले आहे. पाकिस्तान विरुद्ध होणार्या 3 सामन्याची टी-20 मालिका 18 डिसेंबर पासून सुरू होणार आहे.
आम्ही सगळ्याच गोलंदाजांसाठी आहोत तयार
हैदर अली शनिवारी म्हणाला, “मला वाटत नाही, की याच्यामुळे आम्हाला जास्त फरक पडेल. कारण आम्ही त्यांच्या सर्व गोलंदाजाचा सामना करण्याची तयारी करत आहोत. आम्ही कोणत्या एकाच गोलंदाजांवर खासकरून लक्ष देण्यावर विश्वास ठेवत नाही.” तो म्हणाला, “आम्ही विरोधी संघातील सर्व गोलंदाजांना महत्व देतो मग तो लॉकी फर्ग्युसन असो किंवा इतर कोणी. काही वेळा मुख्य गोलंदाजांच्या जागी काही कालावधीचे (पार्ट टाईम) गोलंदाज विकेट घेतात. आमची मानसिकता कोणत्या एका गोलंदाजांवर लक्ष देण्याची नाही. मी आमच्या खेळाबद्दल चिंतित आहे आणि संघासाठी मोठी खेळी करण्याचा प्रयत्न आहे.”
हैदर अली आपल्या सरावाबद्दल बोलताना म्हणाला, “मी धावपट्टीवर खुप वेळासाठी तग धरण्याची आणि आणि प्रत्येक चेंडूवर हिट करण्याच्या सवयीवर काम करत आहे. मला मोठी खेळी करायची आहे आणि डावाला त्याच हिशोबाने पुढे घेवून जायचे आहे.” यादरम्यान हैदरन क्राइस्टचर्चमधील व्यतीत केलेल्या 14 दिवसाच्या क्वारंटाइनबद्दलही बोलला. तो म्हणाला, “हा कालावधी कोणासाठी ही सोपा नव्हता, कारण आम्ही आमच्या खोलीत राहण्यासाठी मजबूर होतो आणि 14 दिवस नेटमध्ये जाऊन सरावसुद्धा करू शकत नव्हतो. काहीवेळा आम्ही नाराज आणि अडचणीत होतो. आम्ही टी-20 सामन्याच्या पूर्वी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.”
पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड सोबत 18 डिसेंबर पासून तीन सामन्याची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यांनंतर 26 डिसेंबर पासून दोन सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे.
संबधित बातम्या:
– या कारणामुळे पाकिस्तानला न्यूझीलंडमध्ये विजय मिळवणे आहे अवघड, माजी खेळाडू इंजमाम उल-हकचे मत
– मोठी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाहेर
– पाकिस्तान विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, या अनुभवी खेळाडूला डच्चू