---Advertisement---

Women’s World Cup: न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द, भारताला मोठा दिलासा

On: रविवार, ऑक्टोबर 19, 2025 7:40 AM
---Advertisement---

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 मधील 19वा सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार होता. मात्र, कोलंबोतील सततच्या पावसामुळे हा सामना पूर्णपणे रद्द करण्यात आला. यामुळे दोन्ही संघांना समान 1-1 गुण देण्यात आले. या सामन्याच्या रद्द होण्याचा थेट फायदा भारताला झाला असून, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टॉप-4 मध्ये आपली जागा कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे.

न्यूझीलंडने जर हा सामना जिंकला असता, तर त्यांनी भारताला मागे टाकत टॉप-4 मध्ये एंट्री केली असती. मात्र सामना रद्द झाल्याने न्यूझीलंडच्या खात्यात फक्त एक गुण जमा झाला आणि त्यांचे एकूण चार गुण झाले. भारताचे देखील चार गुण आहेत, परंतु चांगल्या नेट रनरेटमुळे भारत चौथ्या स्थानी आहे आणि न्यूझीलंड पाचव्या स्थानी राहिला आहे.

या सामन्याच्या रद्द होण्याचा दुसरा मोठा फायदा दक्षिण आफ्रिकेला झाला आहे. 5 सामन्यांत 4 विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने 8 गुणांसह सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. ऑस्ट्रेलियानंतर नॉकआउटमध्ये पोहोचणारा हा दुसरा संघ ठरला आहे. सध्या ते पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत.

या टप्प्यावर पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश या तिन्ही संघांचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे शक्यता अत्यंत कमी झाली आहे. बांग्लादेशने पाकिस्तानविरुद्धचा एकमेव सामना जिंकून 2 गुण मिळवले आहेत. श्रीलंका आणि पाकिस्तानच्या खात्यातील 2-2 गुण हे फक्त रद्द झालेल्या सामन्यांमुळे मिळाले आहेत. या दोन्ही संघांनी अजून एकही सामना जिंकलेला नाही.

सेमीफायनलच्या दोन शिल्लक जागांसाठी आता इंग्लंड, भारत आणि न्यूझीलंडमध्ये चुरशीची लढत होणार आहे. प्रत्येक सामन्याचे महत्त्व वाढले आहे आणि नेट रनरेट निर्णायक ठरणार आहे. आगामी सामन्यांमध्ये कोणती दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुणतालिका (19 ऑक्टोबरपर्यंत)

क्रमांकसंघसामनेविजयपराभवरद्दगुणनेट रनरेट
1ऑस्ट्रेलिया (Q)54019+1.818
2दक्षिण आफ्रिका (Q)54018-0.440
3इंग्लंड43017+1.864
4भारत42204+0.682
5न्यूझीलंड51224-0.245
6बांग्लादेश51402-0.676
7श्रीलंका50322-1.564
8पाकिस्तान50322-1.887

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---