---Advertisement---

संधीचे सोने! तब्बल ९७ सामन्यानंतर कसोटी पदार्पणाची संधी मिळेलेल्या फलंदाजाचा न्यूझीलंडविरुद्ध शतकी तडाखा

Sarel-Erwee
---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (NZ vs SA Test Series) यांच्यात शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) दुसरा कसोटी सामना सुरू झाला. ख्राइस्टचर्चमध्ये हा सामना खेळला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिका संघ एक डाव आणि २७६ धावांनी पराभूत झाला होता. पण उभय संघातील दुसऱ्या सामन्याची सुरुवात दक्षिण अफ्रिकेने चांगल्या प्रकारे केली आहे. याचे श्रेय त्यांचा ३२ वर्षीय सलामीवीर सॅरल इरवी (Sarel Erwee) याला जाते. ही त्याची पदार्पणाची कसोटी मालिका आहे दुसऱ्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली आहे.

सॅरेल इरवीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कसोटी पदार्पण केले. परंतु, पहिल्या कसोटी सामन्यात त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात तो १०, तर दुसऱ्या डावात ० धावांवर बाद झाला होता. संघाच्या एकंदरित प्रदर्शनावर त्याच्या खराब खेळीचा परिणाम झाला आणि सामन्यात संघाने पराभव पत्करला.

पण आता दुसऱ्या सामन्यात मात्र कर्णधार डीन एल्गर आणि इरवी यांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली. एल्गर ४१ धावा करून बाद झाला, पण इरवी दुसऱ्या बाजूला टिकून खेळत राहिला. इरवीने २२१ चेंडूत १०८ धावा साकारल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण अफ्रिकेने तीन विकेट्सच्या नुकसानावर २३८ धावा केल्या.

इरवीला त्याचे कसोटी पदार्पण करण्यासाठी तब्बल ९७ प्रथम श्रेणी सामने खेळावे लागले आहेत. एकंदरित पाहता देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्याकडे मोठा अनुभव आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने हा अनुभव कामी आणला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ५९४१ धावा ठोकल्या आहेत. यामध्ये त्याचे १० शतक आणि ३७ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद २०० धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

इरवी आधी दक्षिण अफ्रिकेचा कीगन पीटरसन असा खेळाडू आहे, ज्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १०० सामने खेळल्यानंतर कसोटी पदार्पण केले. मागच्या वर्षी जून महिन्यात त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यातून कसोटी पदार्पण केले. पीटरसनने भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या काही दिवसांपूर्वीच्या कसोटी मालिकेत अप्रतिम प्रदर्शन केले होते आणि आणि दक्षिण आफ्रिका संघाला विजय मिळवून दिला होता. या मालिकेत पीटरनसने सलग तीन अर्धशतके ठोकली होती.

महत्वाच्या बातम्या –

‘कर्णधार’ रोहित शर्माचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून होणार मोठा सन्मान, कारणही आहे खास

‘कर्णधार’ रोहितचा भारतातील विजयरथ सुसाट! ‘या’ विश्वविक्रमात मॉर्गन, विलियम्सनची केलीये बरोबरी

रोहितने मिळवली टी२०मध्ये बादशाहत! गप्टील-विराटला मागे टाकत ‘हिटमॅन’ची विश्वविक्रमाला गवसणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---