भारताचा पुरूष क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (25 नोव्हेंबर) खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. या सामन्यात भारताकडून अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनी आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण केले. फलंदाजीला उतरलेला भारताचा कर्णधार शिखर धवन आणि शुबमन गिल या दोघांनीही संघाला चांगली सुरूवात करून दिली. तसेच न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन संघात परतला.
यावेळी शिखर धवन (Shikhar Dhawan) याने त्याच्या वनडे कारकिर्दीतील 39वे अर्धशतक केले. त्याने 63 चेंडूत 9 चौकाराच्या साहाय्याने 50 धावा पूर्ण केल्या. धवनने शुबमन गिल (Shubman Gill) याच्या साथीने पहिल्या विकेटसाठी124 धावांची भागीदारीही केली. गिलनेही त्याचे चौथे वनडे अर्धशतक केले. तो 65 चेंडूत 50 धावा करत लॉकी फर्ग्युसन याचा बळी ठरला. गिलने त्याच्या खेळीत एक चौकार आणि तीन षटकार मारले.
4⃣th ODI half-century for @ShubmanGill! 🙌🙌
Also, a 1⃣0⃣0⃣-run stand for the opening pair! 👌👌
Follow the match 👉 https://t.co/jmCUSLdeFf #TeamIndia | #NZvIND
📸 Courtesy: Photosport NZ pic.twitter.com/LKsx2Nzc9w
— BCCI (@BCCI) November 25, 2022
ऑकलंडच्या इडन पार्कवर सुरू असलेल्या या सामन्यात धवन 77 चेंडूत 72 धावा करत बाद झाला. त्याला टीम साऊदी याने फिन ऍलन करवी झेलबाद केले. धवनने त्याच्या डावामध्ये 13 चौकार मारले. सध्या खेळपट्टीवर श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत उपस्थित आहेत.
वनडे मालिकेपूर्वी दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. ज्यामध्ये भारत हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली 1-0 असा जिंकला. धवनने मागील तीन वनडे मालिकेत भारताचे नेतृत्व केले असून त्या तिन्ही मालिका भारताने जिंकल्या. आता न्यूझीलंड दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात असून ही मालिकाही भारत जिंकणार अशा अपेक्षा आहे.
पुढील वर्षी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे, त्याची पूर्वतयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे. NZvIND first odi match shubman gill and shikhar dhawan fifty
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे असा कसा खेळतोय हा! स्टीव स्मिथचा हा शॉट पाहून प्रेक्षक झाले लोटपोट, तुम्हीच बघा आता
‘खूपच शानदार पोरांनो’, निवड समिती बरखास्त झाल्यानंतर चेतन शर्मांचे ट्वीट, बीसीसीआयवर साधला निशाणा