वेलिंगटन। भारतीय क्रिकेट महिला संघाची स्पोटक सलामीवीर स्म्रीती मंधनाने धावा करण्याचा धडाका कायम ठेवत आज (6 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातही तुफान खेळी केली आहे. यावेळी तिने टी20मधील भारताकडून जलद अर्धशतक केले आहे.
स्म्रीतीने 24 चेंडूत हे अर्धशतक पूर्ण केले आहे. या सामन्यात तिने 34 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकाराच्या मदतीने 58 धावा केल्या. मात्र या सामन्यात भारताला 23 धावांनी पराभूत व्हावे लागले आहे.
भारताकडून टी20मधील आधीची दोन जलद अर्धशतकेही स्म्रीतीच्याच नावावर आहेत. तिने 2018मध्ये 25 चेंडूत इंग्लंड विरुद्ध तर 30 चेंडूत ऑस्ट्रेलिया विरुद्ध जलद अर्धशतक पूर्ण केले होते. हे दोन्ही सामने मुंबईमध्ये झाले होते.
याचबरोबर स्म्रितीने जेमिमा रोड्रिगेजसोबत दुसऱ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. महिलांच्या टी-20 क्रिकेटमधील संघ हरताना दुसऱ्या विकेटसाठी झालेली ही सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.
याआधी स्म्रितीने न्युझीलंड विरुद्ध पार पडलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 90 धावांची खेळी केली होती. ही मालिका भारतीय महिला संघाने 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.
आजच्या सामन्यात स्म्रीती बाद झाल्यावर भारताला जिंकण्यासाठी 58 धावांची गरज होती. त्यासाठी भारताकडे 8 विकेट्स शिल्लक होत्या. मात्र नंतरचे फलंदाज फार काळ टिकले नाही. भारताने पुढील 9 विकेट्स 7.3 षटकात 34 धावा करतानाच गमावल्या.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करताना न्यूझीलंडच्या 4 विकेट्स घेताना त्यांना 159 धावांवर रोखले होते. यामध्ये भारताकडून अंरूधती रेड्डी, दिप्ती शर्मा, राधा यादव आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
स्मृती आणि जेमिमा यांनी दुसऱ्या गड्यासाठी केलेली ९८ धावांची भागीदारी महिलांच्या टी-२० मध्ये संघ हरताना दुसऱ्या विकेटसाठी झालेली सर्वात मोठी भागीदारी..#म #मराठी #NZvIND #INDvNZ #SmritiMandhana @Maha_Sports @SherryPaaji @nachi_1793 @Mazi_Marathi @MarathiRT
— Aditya Gund (@AdityaGund) February 6, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
–भाई-भाई: ‘पंड्या ब्रदर्स’ टीम इंडियाकडून एकत्र खेळणारी तिसरी भावांची जोडी…
–न्यूझीलंड-भारत टी२० मालिका हा संघ जिंकणार, जाणून घ्या कारण
–मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी या महिन्यातील ही आहे सर्वात मोठी खुशखबर