---Advertisement---

गोलंदाजाने चेंडूच इतका खतरनाक टाकला की, स्टंपने केला डिस्को डान्स!! फलंदाज ब्रावोही चकित

On: गुरूवार, सप्टेंबर 16, 2021 9:13 AM
---Advertisement---

कॅरेबियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दुसरा सामना गयाना ॲमेझॉन वॉरियर्स आणि सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियस या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियस संघाने गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाला ७ गडी राखून पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली होती. या सामन्यादरम्यान गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघातील वेगवान गोलंदाज ओडेन स्मिथने ज्याप्रकारे ड्वेन ब्रावोला बाद केले, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

या सामन्यात सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघातील सलामीवीर फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. ब्रेंडन किंग आणि हेमराज यांनी दोघांनी प्रत्येकी २७-२७ धावांचे योगदान दिले. तर हेटमायरने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने २ चौकार आणि ४ षटकार मारले होते. या खेळीच्या जोरावर गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाला २० षटक अखेर ९ बाद १७८ धावा करण्यात यश आले होते.

धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियस संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी मिळून ७६ धावा केल्या होत्या. या संघासाठी एविन लुईसने सर्वाधिक ३९ चेंडूंमध्ये ७७ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ३ चौकार आणि ८ षटकार मारले होते. तर ख्रिस आणि ड्वेन ब्रावोने देखील महत्वाचे योगदान दिले. अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियस संघाने अवघ्या १७.५ षटकार लक्ष्य गाठले आणि आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवले.

दरम्यान या सामन्यात गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघातील गोलंदाज ओडेन स्मिथ याने लक्षवेधी कामगिरी केली. ज्याप्रकारे त्याने विरोधी संघाचा कर्णधार ड्वेन ब्रावोला बाद केले, ते पाहून सर्वांनाच आश्चर्य झाले असेल. स्मिथने टाकलेल्या वेगवान चेंडूवर ब्रावोने निघून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.(Odean Smith clean bowled dwayne Bravo watch video)

https://twitter.com/SunnySi40932868/status/1438086188800172039?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1438086188800172039%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fodean-smith-clean-bowled-dj-bravo-in-2nd-semifinal-of-cpl-2021-viral-video-83587

परंतु हा प्रयत्न फसला आणि चेंडू मिडल स्टंप आणि लेग स्टंपला जाऊन धडकला व स्टंप दूरवर उडून पडले. या वेगवान चेंडूवर शॉट खेळताना ब्रावोची बॅट हातातून सुटली होती, ज्यामुळे तो नियंत्रणात दिसून आला नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबईविरुद्ध सर्वाधिक तळपलीय चेन्नईच्या ‘थाला’ अन् ‘चिन्ना थाला’ची बॅट, पाहा टॉप-५ मधील इतर नावे

‘तुमच्याकडं येतंय का पाणी?’, सूर्यकुमारच्या खालच्या मजल्यावरील बुमराहशी गप्पा; मुंबई इंडियन्सची पोस्ट व्हायरल

‘विराट कोहली आणि रवी शास्त्री कसोटी क्रिकेटचे उत्तम समर्थक आणि प्रचारक’, ऑसी दिग्गजाकडून कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---