ऍडलेड। भारताने आज(15 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.
भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी तर एमएस धोनीने नाबाद अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला आहे.
या सामन्यात विराटने वनडेतील ३९वे शतक करताना ११२ चेंडूत १०४ धावा केल्या. यामुळे विजयी वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया देशात शतकी खेळी करणारा तो केवळ चौथाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
यापुर्वी भारतीय खेळाडूंपैकी केवळ सचिन तेंडूलकर (२००४), व्हीव्हीएस लक्ष्मण (२००८), मनिष पांड (२०१६) यांनाच अशी कामगिरी करता आली आहे.
बाकी ११ भारतीय खेळाडूंची शतके ही पराभूत झालेल्या वनडे सामन्यात झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–९ भारतीय कर्णधारांना जे जमले नाही किंग कोहलीने कांगारूच्या भूमीत करून दाखवले
–कर्णधार कोहलीचे दुसऱ्या वनडेत शानदार शतक!
–विराट एक्सप्रेस सुसाट, संगकाराचा विक्रमही मोडला