भारत आणि इंग्लंड या उभय संघात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघात टी-२० आणि वनडे मालिका देखील प्रस्तावित आहे. त्यापैकी ३ सामन्यांची वनडे मालिका ही पुणे शहरानजीक ‘गहुंजे’ स्टेडियमवर खेळवण्याचे नियोजन आहे.
सध्या पुणे शहर परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून परिस्थिती अधिकच बिकट होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारत आणि इंग्लंड संघातील पुण्यात होणारे नियोजीत वनडे सामने अन्यत्र खेळवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘इंडिया टुडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.
इंडिया टुडेतील वृत्तानुसार, पुण्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय आगामी वनडे मालिका पुण्यातून दुसऱ्या शहरात हलवण्याचा विचार करत आहे.
गुरुवारी (२५ फेब्रुवारी) पुण्यात तब्बल १५४२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८ जणांचा या महामारीमुळे मृत्यू झाला आहे. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्र राज्यातही ४ लाखांच्या जवळपास कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर विजय हजारे ट्रॉफी सामन्यांच्या ठिकाणांपैकी एका जागी ही वनडे मालिका आयोजली जाऊ शकते. अद्याप बीसीसीआयने यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही.
कसोटी मालिकेवर यजमानांची मजबूत पकड
पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने द्विशतक शतक झळकावत आपल्या संघाला २२७ धावांनी विजय मिळवून दिला होता. त्यांनतर भारतीय संघाने चोख प्रत्युत्तर देत इंग्लंड संघाला ३१७ धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत केले होते. यात आर अश्विनने अष्टपैलू कामगिरी केली होती.
तसेच नुकत्याच अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी महत्त्वाची भूमिका बजावत १० गडी राखून संघाला विजय मिळवून दिला आहे. पुढील शेवटचा कसोटी सामना अहमदाबादमध्ये ४ मार्च ते ८ मार्च दरम्यान खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल २ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘युनिव्हर्स बॉस’चे पुनरागमन, विंडीज टी२० संघात मिळाली जागा
एका वर्षापुर्वी भारतीय संघातील स्थान नव्हते पक्के, आज तोच बनलाय सर्वात मोठा ‘मॅच विनर’