क्रिकेट सामना कुठलाही असो, त्यात खेळाडूंनी केलेली फलंदाजी, गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नेहमीच लक्षात ठेवले जाते. अशात जर सामना भारताचा असेल आणि त्यामध्ये एखाद्या खेळाडूने अशी अविश्वसनीय कामगिरी केली, तर त्याची जगभरात चर्चा होते. असेच काहीसे भारत विरुद्ध बांगलादेश संघात सुरू असलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील 17व्या सामन्यात पाहायला मिळाले. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याने घेतलेला झेल सध्या क्रिकेटविश्वात चर्चेत आहे.
या सामन्यात बांगलादेशचा नियमित कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) खेळत नाहीये. तो बाहेर असल्यामुळे संघाची धुरा नजमुल होसेन शांतो (Najmul Hossain Shanto) याच्या खांद्यावर आहे. अशात या सामन्यात शांतोने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी बांगलादेशची सुरुवात दमदार झाली. तंजीद हसन आणि लिटन दास या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी रचली. मात्र, पुढील 36 धावांच्या आतच संघाच्या तीन विकेट्स पडल्या.
यातील पहिली विकेट तंजीदच्या (51) रूपात पडली. त्याला कुलदीप यादव याने पायचीत बाद केले. त्यानंतर रवींद्र जडेजा याने लिटन दास याला 66 धावांवर शुबमन गिल याच्या हातून झेलबाद केले. यानंतर तिसरी विकेट सर्वात लक्षवेधी ठरली. ही विकेट मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने घेतली. त्याने मेहिदी हसन मिराज (Mehidy Hasan Miraz) याला केएल राहुल (KL Rahul) याच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे त्याला 3 धावांवर तंबूचा रस्ता पकडावा लागला.
सिराजला कशी मिळाली विकेट?
आपल्या पहिल्या स्पेलमध्ये महागडा ठरलेल्या सिराजने पुनरागमनाच्या षटकात बांगलादेशला तिसरा धक्का दिला. 25वे षटक टाकण्यासाठी आलेल्या सिराजने त्याने मेहिदी हसन मिराजला पहिल्याच चेंडूवर राहुलच्या हातून झेलबाद केले. यावेळी सिराजने टाकलेला चेंडू मिराजच्या बॅटची कड घेऊन मागे गेला. यावेळी यष्टीमागे उभ्या असलेल्या राहुलने डाव्या बाजूला झेप घेत एक हाताने अविश्वसनीय झेल पकडला. सध्या या झेलाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून राहुलच्या झेलाचे कौतुक होत आहे.
https://www.instagram.com/p/Cyk8iJ3P0BO/
राहुलने झेल घेतल्यामुळे मिराजला 13 धावा करून फक्त 3 धावांवर मैदान सोडावे लागले. मिराजची विकेट पडली, तेव्हा बांगलादेश संघाची धावसंख्या 3 बाद 129 धावा होती. (odi world cup 2023 india vs bangladesh kl rahul takes stunning catch see video)
हेही वाचा-
विराटमधील गोलंदाज मोठ्या काळानंतर झाला जागा, सहा वर्षांनंतर केली वनडेत गोलंदाजी । पाहा VIDEO
‘आमच्यावेळचा पाकिस्तान संघ वेगळा होता, आताचा…’, बाबरसेनेविषयी ‘दादा’चं रोखठोक वक्तव्य