CWC 2023: पुण्यातून सुरू सेमी-फायनलची रेस, नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचे श्रीलंकेला फलंदाजीचे आमंत्रण

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 30वा सामना सोमवारी (दि. 30 ऑक्टोबर) अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जातोय. हा सामना पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे रंगणार आहे. या सामन्याआधी झालेली नाणेफेक अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला.
🚨 TOSS NEWS 🚨
Afghanistan Skipper @Hashmat_50 has won the toss and decided that Afghanistan will bowl first against Sri Lanka. 👍#AfghanAtalan | #CWC23 | #AFGvSL | #WarzaMaidanGata pic.twitter.com/ZnYpAFv5Y9
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 30, 2023
पुणे येथे होत असलेल्या या दुसऱ्या सामन्यात विजेत्या संघाच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत राहतील. अफगाणिस्तान संघाने या सामन्यात एकमेव बदल करत फिरकीपटू नूर अहमद याच्या जागी फझलहक फारूखी याला संधी दिली. तर श्रीलंकेने दोन बदल करत जखमी वेगवान गोलंदाजला लाहिरू कुमारा याच्या जागी दुश्मंता चमिरा तर सलामीवीर कुसल परेरा याच्या जागी दिमुथ करूणारत्ने याला निवडले.
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
श्रीलंका
कुसल मेंडिस (कर्णधार), दिमुथ करूणारत्ने, पथुम निसांका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, दुष्मंथ चमीरा, महीश थीक्षणा, कसून रजिता, दिलशान मधुशंका
अफगानिस्तान
हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, इकराम अलीखिल, मोहम्मद नबी, राशिद खान, अजमतुल्लाह उमरजाई, मुजीब उर रहमान, फजलहक फारूखी, नवीन-उल-हक
(ODI World Cup Afganistan Won Toss And Elected Field First)