ODI World Cup 2023क्रिकेटटॉप बातम्या

“अफगाणिस्तान संघाचा कोच होण्याआधी जडेजाने माझा सल्ला घेतला”, पाकिस्तानी खेळाडूचा दावा

विश्वचषक 2023 स्पर्धेतील सोमवारचा (दि. 23 ऑक्टोबर) दिवस अफगाणिस्तान संघासाठी अविस्मरणीय ठरला. स्पर्धेच्या 22व्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने होते. चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. हा वनडेतील अफगाणिस्तानचा पाकिस्तानविरुद्ध पहिला वहिला विजय ठरला. अफगाणिस्तानच्या विजयाचे श्रेय अनेक जण मेंटर अजय जडेजा यांना देत आहेत. आता याबाबत पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने एक मोठा खुलासा केला आहे.

विश्वचषकाच्या अगदी काही दिवस आधी भारताचे माजी क्रिकेटपटू अजय जडेजा हे अफगाणिस्तान संघाचे मेंटर म्हणून रुजू झाले होते. अफगाणिस्तान संघाने या स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी करत गतविजेते इंग्लंड आणि पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर जडेजा यांची मोठ्या प्रमाणात स्तुती होत आहे. त्याबद्दल बोलताना पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू व अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केलेल्या रशिद लतिफ यांनी म्हटले,

“अफगाणिस्तान संघाशी जोडले जाण्याआधी अजयने मला फोन केला होता. हा संघ कसा आहे याचे विचारणा त्याने माझ्याकडे केलेली. त्यावेळी मी त्याला म्हटले तू त्यांना शिकवण्यासाठी जात आहे मात्र तू स्वतः देखील खूप काही शिकून येशील.”

या सामन्यात बाबर आझम याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 50 षटकात 7 विकेट्स गमावत 282 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने 49 षटकात फक्त 2 विकेट्स गमावत 286 धावा केल्या. तसेच, सामना 8 विकेट्सने खिशात घातला.

(Rashid Latif Said Ajay Jadeja Took Advice From Me Before Being Afghanistan Head Coach)

महत्वाच्या बातम्या 

आफ्रिदीला अजूनही आपल्या खेळाडूंवर आत्मविश्वास; म्हणाला, ‘विश्वचषक आपलाच…’‘इंग्लंडचे फलंदाज स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी…’ गतविजेत्यांची खराब फलंदाजी पाहून गंभीरची लक्षवेधी प्रतिक्रिया

Related Articles