वनडे विश्वचषक 2023 मध्ये रविवारी (19 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 240 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या सात षटकांत 47 धावांमध्ये तीन बळी गमावले.
विजयासाठी मिळालेल्या 241 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात मिळाली. जसप्रीत बुमराह याच्या पहिल्या षटकात वॉर्नर व हेड यांनी 15 धावा वसूल केल्या. मात्र, दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर वॉर्नर याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या मिचेल मार्श याने काही मोठे फटके खेळले मात्र तो देखील केवळ 15 धावांचे योगदान देऊ शकला. तर संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा देखील चार धावांवर तंबूत परतला. या दोघांना बुमराह याने बाद केले.
ऑस्ट्रेलिया संघाने दहा षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 6p धावा केल्या होत्या. यादरम्यान भारतीय संघासाठी शमी व बुमराह यांनी प्रत्येकी पाच षटके गोलंदाजी केली.
(ODI World Cup Australia Scored 3 Out 60 Runs in First Powerplay While Chasing 241 In Final)
हेही वाचा-
“मला World Cup Final साठी आमंत्रण नाही”, कपिल देव यांचा BCCI वर गंभीर आरोप
भारतीयांचा हार्ट ब्रेक! World Cup Final मध्ये अर्धशतकानंतर कोहली तंबूत, आता अपेक्षा राहुलकडून