वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 16व्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. एक वेळ अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंडला अडचणीत आणले असताना, कर्णधार टॉम लॅथम व ग्लेन फिलिप्स यांनी शानदार शतकी भागीदारी करत न्यूझीलंडला सामन्यात पुनरागमन करुन दिले. त्यांच्या खेळामुळे न्यूझीलंडने अफगाणिस्तानसमोर 289 धावांचे लक्ष ठेवले.
Glenn Phillips (71), skipper Tom Latham (68) and Will Young (54) help build the total in Chennai. Time to bowl! Follow play LIVE in NZ with @skysportnz. LIVE scoring |https://t.co/KwEW5rcWOQ #CWC23 pic.twitter.com/onpsFsbbGC
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 18, 2023
अफगाणिस्तान संघाने मागील सामन्यात इंग्लंडला पराभूत करण्याची कामगिरी केली होती. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कॉनवे 20 धावा करून बाद झाल्यानंतर रचिन रविंद्र व विल यंग यांनी मोठी भागीदारी करत संघाला शंभरी पार करून दिली. मात्र, ओमरझाईने या दोघांना एकाच षटकात बाद केले. त्यांनी अनुक्रमे 32 व 54 धावा काढल्या. मागील सामन्याचा सामना डेरिल मिचेल केवळ एकाच धावेवर बाद झाला. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था अचानक 1 बाद 109 या स्थितीतून 4 बाद 110 अशी झाली.
त्यानंतर कर्णधार टॉम लॅथम व ग्लेन फिलिप्स यांनी अत्यंत सावधगिरीने खेळत संघाचा डाव पुढे नेला. त्यांनी अखेरच्या आठ षटकांमध्ये वेगाने फलंदाजी करण्यावर भर दिला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी 144 धावांची मोठी भागीदारी केली. फिलिप्सने 71 व लॅथमने 68 धावा केल्या. ते दोघेही एकाच षटकात बाद झाल्यानंतर अखेरच्या तीन षटकात चॅपमनने 12 चेंडूवर 25 धावा करून संघाला 289 पर्यंत मजल मारून दिली.
(ODI World Cup Glenn Phillips And Tom Latham Fight Back For Newzealand Against Afganistan)
हेही वाचा-
नाद केला पण पुरा केला! न्यूझीलंडच्या पठ्ठ्यानं गाजवलं 2023 वर्ष, वनडेत ठोकल्या ‘एवढ्या’ धावा
शाब्बास रे पठ्ठ्या! ICC ODI Rankingमध्ये रोहितचा धमाका, ‘या’ क्रमांकावर झेप घेत सर्वांनाच केले हैराण