भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात ओडिसातील बाराबती स्टेडियम, कटक येथे दुसरा टी२० सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान भारतीय संघ निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १४८ धावा करू शकला. प्रत्युत्तरात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने १८.२ षटकातच ६ विकेट्सच्या नुकसानावर भारताचे लक्ष्य पूर्ण करत सामना जिंकला. यासह दक्षिण आफ्रिकेने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघावर २-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यादरम्यान (INDvsSA) खेळाडूंव्यतिरिक्त अजून एक व्यक्ती आकर्षणाचा भाग ठरली. ती व्यक्ती म्हणजे, ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक होय. पटनायक भारत-दक्षिण आफ्रिकेतील हा सामना पाहण्यासाठी (Naveen Patnaik IN Barabati Stadium) आले होते. सामन्यादरम्यानचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दुसऱ्या टी२० सामन्यासाठी तिकिटांची विक्री सुरू झाल्यानंतर ओडिसाचे मुख्यमंत्री पटनायक (Odhisha CM Naveen Patnaik) यांनी पहिले तिकीट विकत घेतले होते. ओडिसा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज लोचन आणि सचिव संजय बहेरा यांनी पटनायक यांच्या घरी जाऊन त्यांना पहिले तिकीट दिले होते. त्यामुळे पटनायक दुसरा टी२० सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचू शकतात अशी शक्यता होती आणि ती खरीही ठरली.
Watched a terrific T20I #Cricket match between #INDvsSA at the Barabati Stadium. Congratulations to the SA team for winning it. Amazed to see the love for sports among spectators and wish for more matches at Cuttack in future. pic.twitter.com/l6j7lheicw
— Naveen Patnaik (@Naveen_Odisha) June 12, 2022
पटनायक यांनी जितके आवर्जुन या सामन्यासाठी तिकीट विकत घेतले, तितकेच आवर्जुन ते सामना पाहायलाही आले. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने त्यांच्या हातून घंटी वाजवून घेत सामन्याचा शुभारंभ करून घेतला. सामन्यापूर्वीच गांगुली (Sourav Ganguly) आणि पटनायक यांची भेट झाली होती. गांगुली स्वत पटनायक यांना भेटण्यासाठी भुवनेश्वरला गेला होता. गाठभेटीनंतर दोघांमध्ये बराच वेळ बातचीत झाली. मुख्यमंत्री पटनायक यांनी गांगुलीला भारताच्या हॉकी संघाची जर्सीही भेट दिली.
https://twitter.com/Naveen_Odisha/status/1535970296632848385?s=20&t=U1wDp_JEIRjgHU1f4O4QWw
यापूर्वी आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात देशाचे गृहमंत्री अमित शहा त्यांच्या पत्नीसह अहमदाबादच्या स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यानंतर आता पटनाईक यांनी प्रत्यक्षात स्टेडियममध्ये येत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील सामन्याचा आनंद लुटला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकल्यानंतर त्यांनी पाहुण्या संघाचे अभिनंदनही केले.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितविना दुबळी पडतेय टीम इंडिया, रिषभच नव्हे, राहुल आणि विराटही मिळवून देऊ शकले नाहीत विजय
पहिले पाढे पंचावन्न! भारतासाठी दक्षिण आफ्रिकेला हरवणं कठीण, कसोटी, वनडेनंतर टी२०त खातोय गटांगळ्या