इंडियन प्रीमियर लीग २०२२च्या धामधूमीनंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांमध्ये व्यस्त झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात भारताविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळण्यासाठी आला आहे. ९ जूनपासून उभय संघात ही मालिका खेळली जाईल. या मालिकेतील दुसरा टी२० सामना ओडिसामधील कटकच्या बाराबाती स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी खुद्द ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक उपस्थित राहणार असल्याचे समजत आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका (INDvsSA) टी२० सामन्यांच्या तिकिटांची (Tickets For T20 Series) विक्री सुरू झाली आहे. कटक येथील दुसऱ्या टी२० सामन्यासाठीही (Cuttak T20I) तिकीटांची विक्री सुरू झाली असून ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Odhisha CM Naveen Patnaik) यांनी पहिले तिकीट विकत घेतले आहे. ओडिसा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज लोचन आणि सचिव संजय बहेरा यांनी पटनायक यांच्या घरी जाऊन त्यांना पहिले तिकीट दिले आहे. त्यामुळे पटनायक दुसरा टी२० सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचू शकतात.
असे असले तरीही, अद्याप पटनायक खरोखरच सामना पाहायला येतील की नाही, याबद्दल कसलीही माहिती दिली गेलेली नाही. परंतु त्यांनी तिकीट विकत घेतल्याने त्यांच्या येण्याबद्दल अंदाज वर्तवले जात आहेत. आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात देशाचे गृहमंत्री अमित शहा त्यांच्या पत्नीसह अहमदाबादच्या स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यानंतर आता पटनाईक यांच्या येण्याची चर्चा आहे. जर खरोखरच मुख्यमंत्री पटनाईक सामना पाहायला आले तर, त्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त प्रबंध केले जातील.
I am rooting for #TeamIndia for the upcoming #INDvsSA series. Hope fans from all over the world get to see an exciting match at #BarabatiStadium, #Odisha. Looking forward to see you all in #Cuttack. #T20#MenInBlue#TeamIndia#BleedBlue pic.twitter.com/siKRnh0HYk
— Naveen Patnaik (@Naveen_Odisha) June 6, 2022