fbpx
Thursday, February 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयएसएल २०२०-२१ : तळातील ओदिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले

January 20, 2021
in टॉप बातम्या, फुटबॉल
0

गोवा, दिनांक 19 जानेवारी ः हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात मंगळवारी हैदराबाद एफसीला तळातील ओदिशा एफसीने 1-1 असे बरोबरीत रोखले. बाद फेरीच्या शर्यतीत असलेल्या हैदराबादला तेराव्याच मिनिटाला खाते उघडून तसेच मध्यंतराच्या आघाडीनंतरही अखेरीस एका गुणावर समाधान मानावे लागले.

फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. मध्य फळीतील भारताचा 26 वर्षीय खेळाडू हालीचण नर्झारी याने हैदराबादचे खाते 13व्या मिनिटाला उघडले. ओदिशाला मध्य फळीतील दक्षिण आफ्रिकेचा 31 वर्षीय खेळाडू कोल अलेक्झांडर याने बरोबरी साधून दिली. त्यानंतर हैदराबादचे निर्णायक गोलचे प्रयत्न अपयशी ठरले.

हैदराबादचे चौथे स्थान कायम राहिले, पण विजयासह आघाडी वाढवण्याची संधी त्यांनी गमावली. 12 सामन्यांत त्यांना पाचवी बरोबरी पत्करावी लागली असून चार विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 17 गुण झाले. गुणतक्त्यात हैदराबादनंतर नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि चेन्नईयीन एफसी यांचे प्रत्येकी 15, तर बेंगळुरू एफसी आणि जमशेदपूर एफसी यांचे प्रत्येकी 13 गुण आहेत. स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरु असल्यामुळे कमी गुणांचा फरक चुरस वाढवणार आहे.

ओदिशाने 12 सामन्यांत चौथी बरोबरी साधली असून एक विजय व सात पराभव अशा कामगिरीसह त्यांचे सात गुण व अखेरचा 11वा क्रमांक कायम राहिला. मुंबई सिटी एफसी 11 सामन्यांतून 26 गुणांसह आघाडीवर आहे. एटीके मोहन बागानचा दुसरा क्रमांक असून 11 सामन्यांत 21 गुण अशी त्यांची कामगिरी आहे. तिसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवा संघाचे 12 सामन्यांत 19 गुण आहेत.

खाते उघडण्याची शर्यत हैदराबादने प्रारंभीच जिंकली. गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने दमदार किकची क्षमता प्रदर्शित करीत चेंडू मारला. मध्य क्षेत्रात आलेला चेंडू मिळविताना स्ट्रायकर अरीडेन सँटाना याने ताकद आणि प्रसंगावधान प्रदर्शित केले. त्याने हेडिंगवर सहकारी स्ट्रायकर लिस्टन कुलासोकडे चेंडू मारला. लिस्टनने मग त्याच्या स्थितीचा अंदाज घेत स्वतःच प्रयत्न करण्याचा मोह आवरला. त्याने दिलेल्या पासवर नर्झारीने शांतचित्ताने फिनिशींग केले.

ओदिशाची खाते उघडण्यासह बरोबरी साधण्याची प्रतिक्षा दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी संपुष्टात आली. 51व्या मिनिटाला बचाव फळीतील राकेश प्रधान याने थ्रो-इनवर टाकलेला चेंडू आघाडी फळीतील दिएगो मॉरीसिओ याच्यासमोर उसळला. त्यावेळी मॉरीसिओने छातीने चेंडू नियंत्रित केला. प्रतिस्पर्ध्यांना दाद लागू न देता त्याने उजवीकडील अलेक्झांडरला पास दिला. अलेक्झांडरने चेंडूवर नियंत्रण मिळवित बॉक्समध्ये प्रवेश केला. त्याने तोल जात असूनही त्याने उजव्या पायाने अचूक टायमिंगसह फटका मारत चेंडू नेटच्या डाव्या कोपऱ्यात घालविला. त्यावेळी कट्टीमनी याचा अंदाज चुकला. चेंडू नेटच्या बाहेर जाईल असे समजून त्याने प्रयत्नच केला नाही.

दुसऱ्याच मिनिटाला लिस्टनने आगेकूच केली. त्याच्या पासवर मध्यरक्षक महंमद यासीर याने मारलेला फटका मात्र स्वैर होता.
तिसऱ्या मिनिटाला ओदिशाचा स्ट्रायकर मॅन्युएल ओन्वू याने मॉरीसिओला डावीकडे पास दिला. त्यावेळी ऑफसाईड असूनही मॉरीसिओने प्रयत्न केला, पण कट्टीमनी याने चेंडू अडविला.

23व्या मिनिटाला बचावपटू आशिष राय याने थ्रो-इनवर यासीरकडे चेंडू टाकला. त्यातून अरीडेन सँटाना याला संधी मिळाली, पण त्याने ओदिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याच्या अगदी जवळ चेंडू मारला. त्यामुळे ही संधी वाया गेली.

संबधित बातम्या:

आयएसएल २०२०-२१ : दहा खेळाडूंनिशी ईस्ट बंगालने चेन्नईयीनला रोखले

आयएसएल २०२० : चुरशीच्या लढतीत मुंबई-हैदराबाद गोलशून्य बरोबरी

आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालची आज केरला ब्लास्टर्सविरुद्ध लढत


Previous Post

शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकावले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ

Next Post

वेस्ट इंडिजच्या बांगलादेश दौऱ्याची या दिवशी होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Related Posts

Photo Courtesy: Twitter/BCCIDomestic
क्रिकेट

एकचं नंबर भावा! पृथ्वी शॉचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, विजय हजारे ट्रॉफीत शतकानंतर झुंजार द्विशतक 

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

जेव्हा ‘विक्रमादित्य ब्रॅडमन’ यांनी अवघ्या ३ षटकात झळकावले होते शतक

February 25, 2021
Photo Courtesy:Twitter/ICC
इंग्लंडचा भारत दौरा

INDvENG 3rd Test Live: भारताला जबर फटका; रोहित पाठोपाठ पंतही बाद; ४४ ओव्हरमध्ये भारताच्या ६ बाद १२१ धावा

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

शतक हुकलं पण बनला नवा ‘सिक्सर किंग’, रोहित शर्मालाही सोडलं पिछाडीवर

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI/ANI
इंग्लंडचा भारत दौरा

मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान मोदींचं नाव; राहुल गांधी निशाणा साधत म्हणतात, ‘सत्य आपोआप समोर येते’

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

दु:खद! ‘या’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला झाला पितृशोक, कॅन्सरमुळे वडीलांचे निधन

February 25, 2021
Next Post

वेस्ट इंडिजच्या बांगलादेश दौऱ्याची या दिवशी होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक

ऐतिहासिक विजय मिळवून देणारे भारतीय संघातील हिरे! जाणून घ्या या ५ खेळाडूंची संघर्षगाथा

'आख्खं जग आज तुम्हाला सलाम करतंय', ड्रेसिंग रूममध्ये रवी शास्त्रींकडून खेळाडूंचे तोंडभरून कौतूक; पाहा व्हिडिओ

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.