गोवा। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील पहिल्या लेगच्या शेवटच्या टप्प्यात मंगळवारी (२८ डिसेंबर) टॉप फोरमध्ये असलेल्या हैदराबाद एफसीविरुद्ध खेळ उंचावून ओदिशा एफसी गुणतालिकेत वरचे स्थान मिळवण्यास उत्सुक आहे.
बाम्बोलिम येथील ऍथ्लेटिक स्टेडियमवर रंगणाऱ्या सामन्यात ७ सामन्यांतून १२ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी असलेल्या हैदराबादचे पारडे थोडे जड असले तरी मॅनोलो मार्केझ यांच्या प्रशिक्षकपदाखालील क्लबला मागील सहा सामन्यांत पराभव पाहावा लागला नसला तरी एससी ईस्ट बंगाल आणि त्यापूर्वी, एफसी गोवाविरुद्ध १-१ अशी बरोबरी पाहावी लागली आहे. पुढील आठवड्यात, सोमवारी अव्वल स्थानी असलेल्या मुंबई सिटी एफसीचे आव्हान असल्याने ओदिशाविरुद्ध बरोबरीची मालिका खंडित करण्यास हैदराबाद एफसी उत्सुक आहे. ७ सामन्यांतून १० गुण नावावर असलेल्या ओदिशाला मागील तीन सामन्यांत दोन पराभव आणि एका बरोबरीचा सामना करावा लागला आहे.
एफसी गोवाविरुद्धच्या १-१ अशा बरोबरीमुळे सलग पराभवांच्या मालिकेला ब्रेक लागला तरी अव्वल चार संघांत स्थान मिळवण्यादृष्टीने त्यांना वेळीच खेळ उंचवावा लागेल. त्याची सुरुवात त्यांना ओदिशाविरुद्ध करण्याची संधी आहे.
हैदराबाद एफसी हा आयएसएलच्या आठव्या हंगामातील एक समतोल संघ आहे. मात्र, तळातील एससी ईस्ट बंगालविरुद्ध त्यांना बरोबरीत समाधान मानावे लागले. त्यांना गोल करण्याच्या अनेक संधी होत्या. मात्र, प्रतिस्पर्ध्यांचा बचाव अप्रतिम ठरला. पहिल्या सत्रात डॅनियल चिमा चुकवू याने संधीचे सोने केले असते, तर हैदराबाद पुन्हा विजयीपथावर परतला असता. ओदिशाविरुद्ध आक्रमक फळी प्रभाव पाडेल, असा विश्वास प्रशिक्षक मॅनोलो मार्केझ यांना वाटतो.
हैदराबादचा बचावही उत्तम राहिला आहे. त्यांचा गोलफरक १२-६ असा आहे. पुरेसे गुण असले तरी यंदाचा हंगाम आमच्यासाठी थोडा कठीण गेला आहे. आठव्या हंगामात प्रत्येक संघ तुल्यबळ आहे. त्यामुळे प्रत्येकामध्ये दुसऱ्याला हरवण्याची क्षमता आहे, असे प्रशिक्षक मार्केझ यांचे म्हणणे आहे.
ओदिशा एफसी विजयी ट्रॅकवर परतण्यास उत्सुक आहे. पहिल्या दोन सामन्यांत नऊ गोल करूनही त्यांना सातत्य राखता आलेले नाही. मागील पाच लढतींमध्ये त्यांना एकाहून अनेक गोल करता आलेले नाहीत. जोनाथन क्रिस्टियनने दोन गोल करताना बऱ्यापैकी फॉर्म राखला आहे. त्याने गोल करण्याचे पाच प्रयत्न केले. तशी कामगिरी ओदिशासह हैदराबादमधील कुठल्याही खेळाडूला करता आलेली नाही.
उभय संघांमधील आजवरच्या सामन्यांचा निकाल पाहता चार सामन्यांत हैदराबादला ओदिशाविरुद्ध एकच विजय मिळवता आला आहे. त्याचा फायदा मंगळवारी ओदिशाला होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: चालू सामन्यात फुटबॉलपटूचा हार्ट अॅटॅकने मृत्यू, संघ सहकाऱ्यांचा आक्रोश पाहून पाणावतील डोळे
आयएसएल: एटीके मोहन बागानचा नॉर्थ ईस्ट युनायटेडवर निसटता विजय; ह्युगो बॉमॉस ठरला मॅचविनर
‘इस वारी वी टाइटल लै के जाणा है’, विराटकडून मँचेस्टर सिटीच्या मॅनेजरचं पंजाबी स्टाईलमध्ये कौतुक