भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) फुटबॉलप्रेमी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मँचेस्टर युनाइटेड (Manchester United) कडून खेळणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) त्याचा आवडता खेळाडू आहे. कोहली त्याच्याकडून प्रेरणा घेऊनच आपल्या फिटनेसची काळजी घेतो. पण विराट कोहलीचा आवडता संघ मँचेस्टर सिटी आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यात तो संघाची स्तुती करताना दिसत आहे.
मँचेस्टर सिटी सध्या लयीत आहे. त्यामुळेच कोहलीने मँचेस्टर सिटीच्या मॅनेजर असणाऱ्या गार्डियोलाचं कौतुक केलं. कोहली आणि गार्डियोला प्युमा ब्रँडशी जोडलेले आहेत. या व्हिडीओमधून कोहलीने गार्डियोलाचं कौतुक केलं.
कोहली व्हिडीओमध्ये काय म्हणतोय?
३३ वर्षीय कोहलीने जरा हटके पद्धतीत म्हणजे पंजाबीमध्ये गार्डियोलाचं कौतुक केलं. कोहली म्हणाला, “पेप संघ खूपच छान खेळतोय. तू तुझी भूमिका नीट पार पाडली आहेस. आता जिंकूनच जायचं आहे. यावेळीसुद्धा संघाला विजेतेपद मिळायला पाहिजे.”
Chakk de fatte! 💪🏼 @PepTeam pic.twitter.com/OzBWXEF3wH
— Virat Kohli (@imVkohli) December 19, 2021
गार्डियोलाचा संघ मँचेस्टर सिटी सध्या उत्कृष्ट प्रदर्शन करत आहेत. त्यांनी सलग ७ सामने जिंकले आहेत. यात लीड्स (Leeds) समोर ७-० फरकाने जिंकलेला सामना सुद्धा समाविष्ट आहे. त्यामुळे आता गतविजेते गुणतालिकेत आपलं स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. रविवारी न्यूकॅसल युनाइटेड (Newcastle United) सोबत त्यांचा सामना आहे.
याआधी याचवर्षी कोहली आणि गार्डियोलाचं एकमेकांशी व्हिडीओ कॉलवर संभाषण झालं होतं. तेव्हाच विराट कोहलीने त्याचं फुटबॉलबद्दलची आवड व्यक्त केली होती. पेपने सुद्धा कोहलीला आयपीएलसाठी शुभेच्छा दिलेल्या.
विराट सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर
भारताचा कसोटी कर्णधार विराट सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यातील सामन्यांना २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. २६ डिसेंबरपासून पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आनंदी आनंद गडे! २०२१ वर्षात या ८ क्रिकेटपटूंच्या घरी हालला पाळणा
सानिया-शोएबच्या भाच्याची कमाल! अवघ्या १९ व्या वर्षी त्रिशतकवीर बनत केला ‘हा’ विक्रम