---Advertisement---

सानिया-शोएबच्या भाच्याची कमाल! अवघ्या १९ व्या वर्षी त्रिशतकवीर बनत केला ‘हा’ विक्रम

---Advertisement---

सध्या पाकिस्तानमध्ये कायदे-ए-आजम २०२१-२२ ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत युवा खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. अशातच १९ वर्षीय मोहम्मद हुरैराने अप्रतिम खेळी करत इतिहास रचला आहे.(Muhammed Huraira triple century)

मोहम्मद हुरैराने (Muhammed Huraira) वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तिहेरी शतक झळकावले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावत त्याने पाकिस्तानच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याचे दार ठोकले आहे. कायदे-ए-आजम ट्रॉफी स्पर्धेत नॉर्दर्न पाकिस्तान संघाकडून खेळताना बलुचिस्तान संघाविरुद्ध हा कारनामा केला आहे. यासह तो जावेद मियाँदादनंतर सर्वात कमी वयात तिहेरी शतक झळकावणारा पाकिस्तानी (Pakistan) फलंदाज ठरला आहे.

मोहम्मद हुरैराचे पाकिस्तान संघाचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक(Shoaib Malik) आणि सानिया मिर्झा(Sania Mirza) सोबत खास नाते आहे. मोहम्मद हुरैरा हा शोएब मलिकचा भाचा आहे. तसेच त्याच्या खेळीबद्दल बोलायचं झालं तर, मोहम्मद हुरैराने ३२७ चेंडूंमध्ये आपले तिहेरी शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने ३९ चौकार आणि ४ षटकार मारले. याचा अर्थ असा की, १८० धावा त्याने फक्त चौकार आणि षटकाराने केल्या.

त्याने वयवर्ष १९ वर्ष २३९ दिवस असताना हा कारनामा केला आहे, तर जावेद मियादाद यांनी वयवर्ष १७ वर्ष ३१० दिवस असताना तिहेरी शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता.

हे तिहेरी शतक झळकावण्यापूर्वी त्याने केवळ ९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामधील १५ डावात त्याने ४१ च्या सरासरीने ५६७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतक आणि ३ अर्धशतक झळकावले आहेत. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यापूर्वी त्याने पाकिस्तान संघासाठी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे त्याला आयसीसीची स्पर्धा खेळण्याचा देखील अनुभव आहे.

महत्वाच्या बातम्या :

केवळ विराट-अश्विन नाही, तर ‘या’ भारतीय खेळाडूंनाही दक्षिण आफ्रिकेत मोठे विक्रम करण्याची सुवर्णसंधी

खेळपट्टीवर गवत पाहून भारतीय खेळाडू हैराण, द्रविडच्या ‘या’ सल्ल्याने वाढवले संघाचे मनोबल, पाहा व्हिडिओ

दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पहिल्या घासाला खडा लागण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---