आशिया चषक 2023ची सुरुवात 30 ऑगस्ट रोजी होत आहे. अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली या स्पर्धेचा पहिला हंगाम1984 मध्ये आयोजित केला गेला होती. त्यावेळी सामने ही स्पर्धा एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळवली जात होती. 2016 मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा टी-20 प्रकारात खेळवली गेली. मागच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्येही आशिया चषक टी-20 प्रकारात झाला. पण यावर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक देखील वनडे प्रकारात खेळला जाणार आहे. आपण या लेखात अशा पाच यष्टीरक्षक फलंदाजांवर नजर टाकणार आहोत, ज्यांनी आशिया चषकात चमकदार कामगिरी केली आहे.
1. एमएस धोनी – या यादीत प्रथम क्रमांकावर आहे भारताचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni). धोनीच्या नेतृत्वात भारताने वनडे आणि टी-20 विश्वचषकासह चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकली आहे. धोनी आपल्या संघासाठी या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेवर कर्णदार आहे. आशिया चषकात देखील त्याची आकडेवारी जबरदस्त राहिली आहे. धोनीने 19 सामन्यांमधे सर्वाधिक 36 खेळाडूंना तंबूत धाडले आहे. ज्यामध्ये 25 झेल आणि 11 यष्टीचित आहेत.
2. कुमार संगकारा – श्रीलंकेचे माजी दिग्गज कर्णधार व दिग्गज यष्टीरक्षक कुमार संगकारा (Kumar Sangakkara) 2004 ते 2014 पर्यंत श्रीलंकन संघाचा भाग होते. संगकाराने श्रीलंकन संघाला 2011 विश्वचषकात अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले होते. आशिया चषकात देखील देखील संगकाराचे आकडे अप्रतिम राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी आशिया कपमध्ये श्रीलंकेसाठी 24 सामन्यांमधे 36 बळी घेतली, ज्यामध्ये 27 झेल आणि 9 यष्टीचित आहेत.
3. मोईन खान – पाकिस्तानचे माजी खेळाडू व यष्टीरक्षक मोईन खान (Moin Khan) यांनी 1990 ते 2004 दरम्यान पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले. आशिया चषकात देखील त्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांचे योगदान विसर पडण्यासारखे नक्कीच नाही. मोईन खान यांनी आशिया चषकात खेळलेल्या 14 सामन्यांमधे 17 खेळाडूंना बाद केले. यात 12 झेल आणि 5 यष्टीचित आहेत.
4. मुशफिकूर रहीम – मुशफिकूर रहीम (Mushfiqur Rahim) बांगलादेशचा अनुभवी खेळाडू राहिला आहे. त्याने आपला शेवटचा सामना जुलै 2023मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळला आहे. रहीमच्या कारकिर्दीची सुरुवात 2005 साली केली झाली होती. कारकिर्दीत त्याने आशिया चषकाच्या काही हंगामांमध्येही संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. आशिया चषकात खेळलेल्या 21 सामन्यांमध्ये त्याने 17 बळी घेतले. ज्यात 14 झेल आणि 3 यष्टीचित आहेत. आगामी आशिया चषकात देखील मुशफिकूर रहीम बांगलादेशसाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतो.
5. ब्रेंडन कुरुप्पु – श्रीलंकेचे माजी खेळाडू ब्रेंडन कुरुप्पु (Brendon Kuruppu) 1983 ते 1991 दरम्यान श्रीलंकन संघाचा भाग होते. आशिया चषकाच्या एकून दोन हंगामांमध्ये कुरुप्पु यांनी श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आणि यष्टीरक्षक म्हणून महत्वाची भूमिका पार पाडली. यात त्यांनी 9 सामन्यांमधे 14 खेळाडूंना खेळपट्टी सोडायला भाग पाडले. यापैकी 12 खेळाडू यष्टीपाठी झेलबाद, तर 2 यष्टीचित झाले.
(Of the five veteran wicketkeepers who performed well in the Asia Cup, one has yet to retire)
महत्वाच्या बातम्या –
किती ही उदासीनता? भारतीय महिला संघ 9 महिन्यांपासून प्रशिक्षकांविना, बीसीसीआयचे दुर्लक्ष
Oops Moment: उत्साहाच्या भरात पाकिस्तानी फलंदाजाचे सुटले नियंत्रण, टॉवेल सुटताच लज्जास्पद दृश्य कॅमेऱ्यात कैद