---Advertisement---

चेन्नईयनने जबरदस्त खेळ केला, पण हैदराबादने अखेरच्या क्षणी सामना बरोबरीत रोखला

On: शुक्रवार, जानेवारी 13, 2023 8:28 AM
---Advertisement---

हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल)च्या आजच्या सामन्यात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाली. प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चेन्नईयन एफसीने 86व्या मिनिटापर्यंत 1-0 अशी आघाडी कायम राखली होती. गतविजेता हैदराबाद एफसी घरच्या मैदानावरील ही लढत आता गमावतील असे वाटतच होते, परंतु वाफा हखामानेशीकडून अनावधानाने झालेली चूक हैदराबादच्या पथ्यावर पडली. बार्थोलोमेव ऑग्बेचेने पेनल्टीवर गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला अन् चेन्नईयनच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरवले गेले. 90+3 मिनिटाला चेन्नईयकडून गोलसाठी हेडरचा प्रयत्न झाला, परंतु तो अयशस्वी ठरला.

यंदाच्या पर्वात दोन संघ पहिल्या टप्प्यात समोरासमोर आले होते आणि त्यात हैदराबादने 3-1 असा विजय मिळवला होता. हिरो आयएसएलमध्ये उभय संघांत सात सामने झाले होते आणि दोघांनी प्रत्येकी तीन विजय मिळवले होते. एक सामना ड्रॉ राहिला होता, परंतु यंदाची परिस्थिती ही चेन्नईयन एफसीसाठी अवघड आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना विजयापलीकडे दुसरा निकाल नकोच हवाय. मात्र, गतविजेत्या हैदराबादिरुद्धच्या लढतीत चेन्नईयनकडून पहिल्या 15 मिनिटांत काही खास प्रयत्न झालेले दिसले नाही. हैदराबादच्या बोर्या हरेराने 5व्या मिनिटाला गोलजाळीच्या दिशेने मारलेला चेंडू पोस्टवरून गेला. त्यानंतर झेव्हियर सिव्हेरियोनेही एक प्रयत्न केला. आतापर्यंत बॅकफूटवर पडलेल्या चेन्नईयनने अचानक गिअर बदलला. 19व्या मिनिटाला व्हिन्सी बरेट्टोने चेन्नईयनला आघाडी मिळवून देण्याची सोपी संधी गमावली.

बरेट्टोने संयम दाखवला असता तर हैदराबादच्या गोलरक्षकाला त्याला चकवता आले असते. सोपी संधी गमावल्यानंतर चेन्नईयनकडून पुढच्याच मिनिटाला पुन्हा एक प्रयत्न झाला. ज्युलियस डुकरच्या पासवर पीटर स्लिस्कोव्हिचने हेडरद्वारे केलेला प्रयत्नही गोलपोस्ट जवळून गेला. 25व्या मिनिटाला गोलजाळीच्या तोंडावर सिव्हेरियोने गोल करण्याची संधी निर्माण करून दिली होती, परंतु रोहित दानू थोडक्यात हुकला अन् हैदराबादला आघाडी घेता आली नाही. 33व्या मिनिटाला चेन्नईयनकडून एक सुरेख प्रयत्न झाला. त्यांच्या आक्रमणात विविधता असल्याने हैदराबादचे बचावपटू गोंधळले होते. चेन्नईयन एफसीचा कर्णधार अनिरुद्ध थापाचा एक प्रयत्न अगदी थोडक्यात अयशस्वी ठरला.सुरुवातीचा 15 मिनिटांचा खेळ वगळल्यास चेन्नईयनने पहिल्या हाफमध्ये वरचढ खेळ राहिला.

मध्यंतरानंतर चेन्नईयनचा दबदबा कायम राहिलेला दिसला. 57व्या मिनिटाला आकाश सांगवानच्या पासवर पीटर स्लिस्कोव्हिचने गोल करत चेन्नईयनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. आक्रमणासोबतच चेन्नईयनने त्यांचा बचावही मजबूत ठेवला होता आणि त्यामुळे हैदराबादचे बरोबरीचे होणारे प्रयत्न अपयशी ठरताना दिसले. 77व्या मिनिटाला गोलरक्षक सामिक मित्राने चेंडू रोखण्यासाठी जागा सोडली अन् त्याचे हे धाडस चेन्नईयनच्या अंगलट आले असते. पण, हातातून निसटलेल्या चेंडूवर मित्राने त्वरीत नियंत्रण मिळवले अन् सिव्हेरियोची गोल करण्याची संधी हुकली. पण, 86व्या मिनिटाला नाट्यम वळण घेतले. वाफा हखामानेशीने पेनल्टी क्षेत्रात सिव्हेरियोच्या पायावर चुकून लाथ मारली अन् रेफरीने हैदराबादला पेनल्टी दिली. 87व्या मिनिटाला बार्थोलोमेव ऑग्बेचेने पेनल्टीवर गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला. त्यानंतर विजयासाठीचे जोरदार प्रयत्न झाले, परंतु दोन्ही संघांना 1-1 गुणावर समाधानी राहावे लागले.

निकाल : चेन्नईयन एफसी 1 ( पीटर स्लिस्कोव्हिच 57 मि. ) बरोबरी वि. हैदराबाद एफसी 1 ( बार्थोलोमेव ऑग्बेचे 87 मि.)
(Ogbeche penalty denies Chennaiyin FC as defending champions rescue crucial point in 1-1 thriller)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsSL | श्रीलंकन संघावर मोठी नामुष्की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नकोसा विक्रम भारताने टाळला
टीम इंडियापुढे श्रीलंका नेहमीच ढेर! शानदार विजयासह वनडे इतिहासात ‘रोहित ब्रिगेड’ टॉपला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---