भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने २३ जून २००७ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आज त्याच्या पदार्पणाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आयर्लंड विरुद्धच्या त्या पदार्पणाच्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र पुढे जाऊन त्याने अनेक विक्रमे आपल्या नावे केली आहेत. त्यातील काही विक्रम कोणताही खेळाडूला तोडणे अशक्य आहेत. असेच काही त्याने केलेले विक्रम आपण पाहुयात.
रोहितने वनडे क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केली आहे. त्याने तीन वेळा द्विशतके झळकावली आहे. बाकीच्या फलंदाजांविषयी पाहिले तर कोणत्याच खेळाडूने दोन वेळा पण हा विक्रम केला नाही. त्याची २६४ ही वनडेमधील सर्वोत्तम खेळी ठरली आहे. त्याने २०१४मध्ये श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली होती.
रोहितने २०१९च्या विश्वचषकामध्ये ५ शतके ठोकली होती. एका विश्वचषकाच्या स्पर्धेत पाच शतके करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्यााच्याआधी २०१५मध्ये कुमार संगकाराने चार शतके केली होती. भारताकडून माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने २००३च्या विश्वचषकामध्ये तीन शतके केली होती.
आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये रोहितने आठ वेळा १५० धावांचा टप्पा गाठला आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाजी डेविड वॉर्नरचा क्रमांक लागतो. त्याने सहा वेळा अशी कामगिरी केली आहे. तसेच भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल यांनी प्रत्येकी पाच-पाच वेळा अशी कामगिरी केली आहे. विराट कोहली (Virat Kohli) याने चार वेळा १५० धावांचा टप्पा गाठला आहे.
वनडे बरोबरच टी२० क्रिकेटमध्येही रोहितची बॅट तळपली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये चार शतके केली आहेत. ग्लेन मॅक्सवेल आणि कोलिन मुन्रो यांच्या नावावर प्रत्येकी तीन-तीन शतके आहेत. भारताकडून केएल राहुलने पण आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये दोन शतके ठोकली आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच त्याने आयपीएलमध्येही (इंडियन प्रीमियर लीग) मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करताना सर्वोत्कृष्ठ कामगिरी केली आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली संघाने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. एमएस धोनी (MS Dhoni) यानेे चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना चार विजेतेपद जिंकली आहेत.
रोहित आता इंग्लंडमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. विदेशी भूमीवर कसोटीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची त्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-






