इंग्लंडचा माजी फलंदाज अॅलिस्टेअर कुक यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये मोठा बदल करण्याची मागणी केली आहे. कुक यांचे म्हणणे आहे की टेस्टमध्ये दशकांपासून चालत आलेल्या चेंडू बदलण्याच्या नियमात बदल व्हायला हवा.
कुक यांच्या मते, एका संघाला 160 षटकांच्या आत कोणत्याही वेळी चेंडू बदलण्याची परवानगी असली पाहिजे.
‘स्टिक टू क्रिकेट’ शोमध्ये बोलताना कुक म्हणाले की, संघाला कोणत्याही वेळी नवा चेंडू घेण्याची मुभा असावी. मग तो चेंडू 30 षटकांत बदलायचा असेल किंवा 60 षटकांत. सध्याच्या नियमानुसार, संघाला 80 षटकांनंतरच चेंडू बदलण्याची परवानगी मिळते. मात्र अशा परिस्थितीत संघाला अनेकदा जुना चेंडू घेऊन बराच वेळ गोलंदाजी करावी लागते.






