---Advertisement---

सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटूचे निधन, वयाच्या ११० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

On: रविवार, डिसेंबर 5, 2021 11:40 AM
---Advertisement---

येत्या ८ डिसेंबर पासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिकेला प्रारंभ होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंड क्रिकेटमध्ये शोककळा पसरली आहे. इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वयोरुद्ध महिला क्रिकेटपटूने शनिवारी (४ डिसेंबर) जगाचा निरोप घेतला आहे.

इंग्लंड क्रिकेटच्या सर्वात वयोवृद्ध महिला क्रिकेटपटू इलीन ऐश यांचे वयाच्या ११० व्या वर्षी निधन झाले आहे. इलीन ऐश यांनी दुसरे महायुद्ध होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर इंग्लंड संघासाठी कसोटी सामने खेळले होते. त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी एकूण ७ कसोटी सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांनी २३ च्या सरासरीने एकूण १० गडी बाद केले होते. त्यांनी १९३७ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पदार्पण केले होते. तसेच निधन होण्यापूर्वी त्या सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटू होत्या.

त्यांनी १९४९ मध्ये ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते.याशिवाय त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये ‘सिव्हिल सर्व्हिस वुमन’, ‘मिडलसेक्स वुमन’ आणि ‘साउथ वुमन’चे प्रतिनिधित्व केले होते. ईसीबीने ( इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड) एका निवेदनात म्हटले आहे की, “इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डला इलीन ऐश यांनी वयाच्या ११० वर्षांनी निरोप घेतल्यानंतर खूप दुःख झाले आहे.”

इलीन ऐश यांनी २०१७ महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात घंटा वाजवली होती. या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघाला पराभूत केले होते. त्यांनी क्रिकेटसह दुसऱ्या विश्व युद्धात देखील आपले योगदान दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

अद्भुत: कुंबळे आणि लॅकरच्या १० विकेट्स प्रत्यक्ष मैदानावार पाहाणाऱ्या ‘त्या’ माणसाबद्दल माहित आहे काय?

एका स्पिनरने घडविलेला इतिहास पाहून दुसरा स्पिनर खूश; अश्विनचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

साहेबांनी थोपटली पाठ! एजाजच्या पराक्रमाची शरद पवारांकडूनही दखल, मोजकेच शब्द पण पोटभर कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---