fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

क्रिकेटमध्ये असा ‘बाप’ योगायोग ना कधी पुन्हा झाला, ना कधी पुन्हा होईल!

Richard Stokes: The man who witnessed both the 10-wicket hauls in Test cricket live from the ground

कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाला एका डावात ५-६ विकेट्स घेताना पाहणे एक चांगली गोष्ट समजली जाते. मात्र, जर गोलंदाजाने एका डावात सर्व १० विकेट्स घेतल्या तर! तसं विचार केला तर, ही सरळ सरळ अशक्य गोष्ट वाटते.

पण, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे असाधारण काम करणारे २ हिरे आहेत. त्यांनी कसोटी सामन्याच्या एका डावात आपल्या गोलंदाजीने विरुद्ध संघाच्या १० फलंदाजांचा पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.

यातील पहिले नाव जीम लॅकर. १९५६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ओल्ड ट्रॅफेड, मॅंचेस्टर येथील चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्यांनी हा पराक्रम केला होता. तर पहिल्या डावात त्यांनी ९ विकेट्स घेतल्या होत्या.

भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.

घडला होता खास योगायोग- 

कुंबळे व लॅकर यांचा हा पराक्रम अनेकांनी टेलिव्हीजनच्या माध्यमातून लाईव्ह पाहिला आहे. परंतु एक असा व्यक्ती आहे ज्याने हे दोन सामने थेट मैदानात पाहिले होते.

जिम लॅकर यांनी जेव्हा या १९ विकेट्स घेतल्या होत्या तेव्हा एक १० वर्षांचा मुलगा हा ऍशेस मालिकेतील हा सामना पाहण्यासाठी आला होता. त्यानंतर ४३ वर्षांनी व जवळपास १४४३ कसोटी सामन्यानंतर अनिल कुंबळेने डावात १० विकेट्स दिल्ली कसोटीत घेतल्या. यावेळी तो १० वर्षांचा मुलगा ५३ वर्षांचा झाला होता व तो हा सामना स्टेडियमवर पाहण्यासाठी उपस्थित होता.

त्या मुलाच नावं रिचर्ड स्टोक्स. रिचर्ड स्टोक्स हे जर्मनीमध्ये एका कंपनीत काम करत होते व तेव्हा ते कामानिमित्त दिल्ली येथे आले होते. तेव्हा त्यांनी वेळात वेळ काढून या कसोटी सामन्याला हजेरी लावली.

योगायोग म्हणजे या सामन्यात भारतीय संघाचा फिरकीपटू अनिल कुंबळेने १० विकेट्स घेतल्या होत्या. एक प्रेक्षक म्हणून त्यांना ४३ वर्षांच्या अंतराने दुसऱ्यांदा कसोटीत १० विकेट्स पाहण्याचा अनुभव याची देही याचा डोळा घेता आला होता.

विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये डावात केवळ २ वेळाच असाच पराक्रम झाला आहे व हे दोन्ही सामने स्टोक्स यांनी मैदानावर जावुन पाहिले होते. गमतीचा भाग म्हणजे त्यांनी त्यांच्या पुर्ण जीवनात हे दोनच सामने मैदानावर जावुन पाहिले होते.

स्टोक्स यांचे वडील हे बी डिव्हिजनमध्ये सरे या काऊंटी क्लबकडून क्रिकेट खेळले होते.

स्टोक्स तेव्हा म्हणाले होते की, मी लंच झाल्यानंतर दिल्ली कसोटीत सामना पहायला गेलो. तेव्हा पाकिस्तान अतिशय सुस्थितीत होता. परंतु मी गेलो आणि कुंबळेने चटकन दोन विकेट्स घेतल्या. मी माझ्या मित्राला सांगितले की, ‘मी कुंबळे व भारतासाठी लक घेऊन आलो आहे. जेव्हा कुंबळेने ६ विकेट्स घेतल्या तेव्हा मी माझ्या मित्राला म्हणालो, की लॅकरच्या १० विकेट्स मैदानावर जावुन पाहिल्या आहेत. माझा मित्र लगेच मला म्हणाला, की इतिहास पुन्हा घडणार आहे. तेव्हा मी त्याकडे पाहुन स्मितहास्य केले होते. ‘

You might also like