कोलकाता | गुरुवारी 19 डिसेंबर रोजी आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सने 48 वर्षीय प्रवीण तांबेला 20 लाखांच्या मूळ किंमतीत संघात सामील केले. यामुळे या स्पर्धेत संधी मिळालेला तांबे हा सर्वाधिक जूना खेळा़डू ठरला आहे.
फिरकीपटू प्रवीण तांबेने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. 8 ऑक्टोबर 1971 ही प्रविणची जन्मतारिख असून 48 वर्षे 76 दिवस त्याचे सध्याचे वय आहे. तर याच कोलकाता नाइट रायझर्सचे मुख्य प्रशिक्षक ब्रॅंडन मॅक्युलम 38 वर्षांचे आहेत. त्यामुळे खेळाडूचे वय 48 आणि प्रशिक्षक 38 वर्ष असं वेगळंच समीकरण यावेळी पहायला मिळणार आहे. ब्रॅंडन मॅक्युलम हे तांबेपेक्षा तब्बल 10 वर्षांनी लहान आहेत.
2013 पर्यंत तांबे कोणत्याही प्रथम श्रेणी सामन्यात खेळला नव्हता. परंतु 2013 मध्ये राहुल द्रविडची नजर त्याच्यावर पडली आणि द्रविडने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी तांबेची निवड केली.
त्याला 2013मध्ये वयाच्या 41 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये पहिल्यांदा संधी दिली होती. 3 वर्षे राजस्थानकडून खेळल्यानंतर 2016 मध्ये गुजराज लायन्सने आपल्या संघात घेतले होते. तर 2017 मध्ये त्याला सनरायझर्स हैद्राबाद संघाने 10 लाखात संघात सामील करुन घेतले.
अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने वयाच्या 46 व्या वर्षी मुंबईकडून पदार्पण केले. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 2 रणजी सामने तर 6 अ दर्जाचे सामने खेळले आहेत.
आयपीेएलमध्ये 2014 च्या मोसमात त्याने राजस्थानकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हॅट्रिक घेतली होती. त्याच कोलकाता संघाचा तो या मोसमात सदस्य असणार आहे.
ब्रॅंडन मॅक्युलमच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण तांबे कशी कामगिरी करतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वाढते वय ही समस्या नाही, केकेआरने काहीतरी पाहिले म्हणूनच मला खरेदी केले – प्रविण तांबे
वाचा- 👉https://t.co/iZvvfkM82R👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi@MarathiRT #IPL2020Auction
— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019
केवळ ९ धावा करताच रोहित शर्मा मोडणार २२ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम
वाचा- https://t.co/jAGh1OcPNb#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi@MarathiRT #INDvWI
— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019