---Advertisement---

रॉबिन्सननं एका षटकात दिल्या 43 धावा! 134 वर्षात पहिल्यांदाच घडला इतिहास, पाहा व्हिडिओ

On: बुधवार, जून 26, 2024 7:15 PM
Ollie Robinson
---Advertisement---

इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सननं (Ollie Robinson) एका षटकात सर्वाधिक धावा देण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावावर केला. काउंटी चॅम्पियनशिप 2024 मध्ये ससेक्स आणि लीसेस्टरशायर यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात रॉबिन्सननं एका षटकात 46 धावा दिल्या. क्रिकेटच्या 134 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही गोलंदाजानं अद्याप एका षटकात एवढ्या धावा दिल्या नाहीत.

ससेक्स आणि लीसेस्टरशायर या सामन्याच्या चौथ्या दिवशी लेस्टरशायरकडून खेळणारा फलंदाज लुईस किम्बर (Louis Kimber) यानं रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. रॉबिन्सनच्या षटकात किम्बरनं 5 षटकार आणि 3 चौकार ठोकले, तर 1 धाव घेतली. ओली रॉबिन्सननं (Ollie Robinson) त्याच्या षटकात 3 नो बॉल टाकले आणि लुईस किम्बरनं तिन्ही चेंडूंवर षटकार ठोकले.

एका षटकात सर्वाधिक धावा देण्याच्या बाबतीत रॉबिन्सननं ॲलेक्स ट्यूडर (Alex Tudor) आणि शोएब बशीरला (Shoaib Bashir) मागे टाकले. 1998 मध्ये सर्वेकडून खेळताना ॲलेक्स ट्यूडरनं 38 धावा दिल्या होत्या आणि यावर्षी 24 जून रोजी बशीरनं वॉर्सेस्टरशायर संघासाठी खेळताना एका षटकात 38 धावा दिल्या होत्या. परंतू आता इंग्लंडच्या या स्टार गोलंदाजानं या दोन्ही गोलंदाजांना मागे टाकत 134 वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला आणि एकाच षटकात 43 धावा दिल्या.

 

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs ENG सेमीफायनल 2 सामन्यासाठी का नाही राखीव दिवस? जाणून घ्या
यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा रचणार का इतिहास?
सेमीफायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का; आयसीसी टी20 क्रमवारीत ट्रॅव्हिस हेडनं मारली मुसंडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---