---Advertisement---

सेमीफायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का; आयसीसी टी20 क्रमवारीत ट्रॅव्हिस हेडनं मारली मुसंडी

On: बुधवार, जून 26, 2024 4:09 PM
---Advertisement---

ट्रॅव्हिस हेडने आयसीसी टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवकडून नंबर-1 स्थान हिसकावून घेतले आहे. सूर्या डिसेंबर 2023 पासून आयसीसी टी20 फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता, परंतु टी20 विश्वचषक 2024 मध्ये ट्रॅव्हिस हेडच्या त्याच्या शानदार फलंदाजीमुळे त्याने आयसीसी क्रमवारीत चार स्थानांनी झेप घेत पहिले स्थान गाठले. ट्रॅव्हिस हेड टी20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने आतापर्यंत 7 डावात 42 च्या सरासरीने 255 धावा केल्या आहेत.

वास्तविक, टी20 विश्वचषक 2024 मधील सेमी फायनलमधील सामन्यापूर्वी, आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत मोठा बदल दिसून आला आहे. सूर्यकुमार यादवने नंबर-1चा मुकुट गमावला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने सूर्याकडून क्रमांक-1चे स्थान हिसकावून घेतले आहे. ट्रॅव्हिस हेडने भारताविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात 43 चेंडूत 76 धावांची खेळी खेळली होती.

ट्रॅव्हिस हेडची खेळी ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेऊ शकली नसली तरी या सामन्यात झंझावाती खेळीने त्याच्या आयसीसी क्रमवारीत सुधारणा झाली आहे. ट्रॅव्हिसने 4 स्थानांची झेप घेत टी20 फलंदाजी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत 6 डावांत 29 च्या सरासरीने 149 धावा करता आल्या आहेत. 33 वर्षीय सूर्याने सलग दोन सामन्यांमध्ये अर्धशतकांची खेळी केली आहे आणि आता तो आयसीसी क्रमवारीत  842 च्या रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसला तीन स्थानांचे नुकसान झाले आहे. मार्कस 211 च्या रेटिंगसह चौथ्या स्थानावर घसरला आहे, तर हार्दिक पांड्याला चार स्थानांचा फायदा झाला आहे. हार्दिक पांड्या 213 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

महत्तवाच्या बातम्या-

भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात कोणाचं पारडं जड, जाणून घ्या हेड टू हेड रेकाॅर्ड
मागील आकडेवारी दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं; पण प्रत्यक्षात अफगाणिस्तानचं पारडं जड
“यावेळी भारत हरणार नाही…” इंग्लंडच्या माजी कर्णधारानं केलं वक्तव्य!

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---