यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सेमीफायनल सामन्यांचा थरार गुरुवारी, 27 जून रोजी रंगणार आहे. सेमीफायनल 1 मध्ये अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे, तर सेमीफायनल 2 मध्ये भारतीय संघ इंग्लंडशी भिडणार आहे. यावेळी आयसीसीनं टी20 विश्वचषकाच्या दोन्ही सेमीफायनल सामन्यांचे नियम वेगळे ठेवले आहेत. त्यामध्ये पहिल्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे तर दुसऱ्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला नाही.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या पहिल्या सेमीफायनल सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर या सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि षटकं कमी करुनही सामना पूर्णपणे खेळता आला नाही, तर तो राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. त्यामध्ये पहिल्या दिवसाच्या खेळासाठी अतिरिक्त 60 मिनिटे आणि राखीव दिवसासाठी अतिरिक्त 190 मिनिटे ठेवण्यात आली आहेत. परंतू पावसामुळे राखीव दिवशी सामन्याचा निकाल लागला नाही, तर दक्षिण आफ्रिकेचं फायनलसाठी तिकीट पक्कं होईल.
सेमीफायनल 2 सामना भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. सेमीफायनल 1 सामन्याप्रमाणे या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. जर पावसानं या सामन्यात खोळंबा घातला तर सामना पूर्ण करण्यासाठी 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ असणार आहे. पावसामुळे या सामन्याचा निकाल लागला नाही, तर भारत फायनलसाठी तिकीट पक्कं करणार आहे.
सेमीफायनल 1 सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता खेळला जाणार आहे. परंतू जर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनल 2 सामन्यात राखीव दिवस ठेवला गेला असता तर सामना 28 जूनपर्यंत लांबला असता आणि विश्वचषक फायनल 29 जूनला रोजी खेळला जाणार आहे. त्यामुळे भारत किंवा इंग्लंड कोणताही संघ फायनलमध्ये पोहोचला तर त्यांना विश्रांतीसाठी वेळ मिळणार नाही. त्यामुळे सेमीफायनल 2 साठी राखीव दिवस ठेवण्यात आला नाही.
भारत विरुद्ध इंग्लंड संघाचे हेड टू हेड रेकाॅर्ड
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड 23 वेळा भिडले आहेत. त्यामध्ये भारताचं वर्चस्व राहिलं आहे. भारतानं 12 सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर इंग्लंडनं 11 सामने जिंकले आहेत. परंतू आयसीसी टी20 विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup) इतिहासात भारत आणि इंग्लंड 4 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टी20 विश्वचषकात दोन्ही संघांची कामगिरी समान आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा रचणार का इतिहास?
सेमीफायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का; आयसीसी टी20 क्रमवारीत ट्रॅव्हिस हेडनं मारली मुसंडी
भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात कोणाचं पारडं जड, जाणून घ्या हेड टू हेड रेकाॅर्ड






