इंग्लंडचा युवा फलंदाज ओली पोप सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्याच्याकडून सध्या अपेक्षित कामगिरी होत नाही. इंग्लंडला भारताविरुद्धच्या मालिकेत या युवा फलंदाजाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र, त्या अपेक्षांवर तो खरा उतरला नाही. जेव्हा फलंदाजाचे नशीब आणि फॉर्म चांगला नसतो तेव्हा, तो विचित्र पद्धतीने बाद होऊ शकतो, याचा प्रत्यय आज ओली पोप याला आला.
दुर्दैवीरित्या बाद झाला पोप
इंग्लंडच्या मधल्या फळीतील युवा फलंदाज चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अत्यंत दुर्देवीरित्या बाद झाला. इंग्लंडच्या डावातील ६२ व्या षटकात भारताच्या रविचंद्रन अश्विनने त्याला चकवले. त्याचे झाले असे की, मागील चेंडू जास्त वळल्याने, पुढील चेंडू देखील वळेल अशा अपेक्षेने पोप त्या चेंडूचा सामना करण्यासाठी पुढे आला. चेंडू सरळ राहिल्याने पोपने तो फ्लिक केला. मात्र, चेंडूने बॅटची कड घेतल्याने चेंडू वर उडाला व शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या शुबमन गिलच्या हातात गेला. त्याने एक शानदार झेल टिपला.
First strike of the match for @ashwinravi99! ????????
@RealShubmanGill takes the catch as Ollie Pope departs.
England 6⃣ down! @Paytm #INDvENG #TeamIndia
Follow the match ???? https://t.co/9KnAXjaKfb pic.twitter.com/j8kWjrocKU
— BCCI (@BCCI) March 4, 2021
पोपला वाटले की, चेंडू जमिनीवर लागल्यानंतर गिलच्या हातात गेला आहे. परंतु, पंचांनी स्पष्ट केले की, गिलने हा स्पष्ट झेल घेतला आहे. पोपने ८७ चेंडूंचा सामना करताना २९ धावा केल्या यामध्ये २ चौकारांचा समावेश होता. पोप बाद झाल्याने, लॉरेन्ससोबतची त्याची ४५ धावांची भागीदारी संपुष्टात आली.
https://twitter.com/QuickWristSpin/status/1367410433670320129?s=20
पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताने १२ षटकांत १ गडी गमावून २४ धावा केल्या आहेत. शुबमन गिलच्या रूपाने भारताला धक्का बसला. रोहित शर्मा ८ तर चेतेश्वर पुजारा १५ धावा काढून नाबाद आहे. तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव ७५.५ षटकांत २०५ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली.
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी तगडी फलंदाजी करून मोठी आघाडी घेण्याचा भारतीय फलंदाजांचा मानस असेल. भारताच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा व विराट कोहलीवर असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तो’ मैदानावर येताच सिराजला मिळाली विकेट, बघा कोण आहे ‘मिया भाई’चा लकीचार्म
‘बेन स्टोक्सने मला शिवी दिल्याचे विराटला सांगितले, मग त्याने पुढे सर्व सांभाळले’, सिराजचा खुलासा
पोलार्डने सहा षटकरांच्या विक्रमाची बरोबरी केल्यावर युवराजने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाला…






