ऑलिंपिक्समध्ये भारतीय फुलबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणारे आणि १९६२ च्या आशियाई क्रिडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचे सदस्य ओ. चंद्रशेखर मेनन यांचे मंगळवारी (२४ ऑगस्ट) वृद्धापकाळाने निधन झाले आहे. आपल्या निवासस्थानीच त्यांना अखेरचा श्वास घेतला. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या कुटुबींयांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.
कुटुबांशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, “भारतीय फुटबॉल संघाचे माजी डिफेंडर चंद्रशेखर गेल्या काही दिवसांपासून म्हातारपणाशी संबंधित आजाराने पिडीत होते.” त्यांनी काही फुलबॉल स्पर्धांमध्ये संघाचे नेतृत्वही केले होते. १९६२ च्या जकार्ता आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या आणि १९६० च्या रोम ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय संघाचे ते सदस्य होते.
त्रिशूर जिल्ह्यातील इरिंजालाकुडाचे राहणारे चंद्रशेखर यांनी १९५८ ते १९६६ दरम्यान भारताकडून २५ फुटबॉल सामने खेळले होते. ते १९६१ च्या मर्डेका चषकात सहभागी होणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होते. देशांतर्गत पातळीवर त्यांनी १९५९ ते १९६५ दरम्यान संतोष ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. १९६३ साली हा संघ विजेता ठरला होता. याखेरीज १९५८-१९६६ या काळात ते कैल्टेक्स क्लब आणि १९६७-१९७२ मध्ये भारतीय स्टेट बँक फुटबॉल संघांकडून खेळले होते.
AIFF condoles O Chandrasekhar's demise 🙏💐
Read here 👉 https://t.co/r42aalgRnI#IndianFootball #RIP pic.twitter.com/WlFs0CJdKR
— Indian Football Team (@IndianFootball) August 24, 2021
चंद्रशेखर यांच्या निधनानंतर एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “चंद्रशेखर आज आपल्यात राहिले नाहीत, हे ऐकून खूप दु:ख झाले. ते आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या संघाचा महत्त्वपूर्ण भाग होते. त्यांनी भारतीय खेळासाठी दिलेले योगदान सदैव आमच्या स्मरणात राहील.”
महत्वाच्या बातम्या-
प्रेक्षकांचे आक्षेपार्ह कृत्य!! चक्क मैदानावर उतरत खेळाडूंवर केला हल्ला, एकजण गंभीर जखमी
अतिशय दुर्दैवी! अफगानी फुलबॉलपटूचा विमानातून कोसळून मृत्यू, तालिबानींच्या भितीने सोडत होता देश
अश्रूंचे झाले करोडो! मेस्सीने डोळे पुसलेल्या टिश्यू पेपरची बोली गेली ‘इतक्या’ कोटींमध्ये