बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रविवारी (27 ऑगस्ट) भारतासाठी सोन्याचा दिवस उगवला. भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने सुवर्णपदक जिंकून या स्पर्धेच्या इतिहासात सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय होण्याचा मान मिळवला. त्याने पाकिस्तानच्या अर्शद नदीम याला पराभूत केले.
The moment Neeraj Chopra created history and became the first Indian to win Gold at World Athletics Championships.
Neeraj is India's pride…!! 🇮🇳 pic.twitter.com/OI9p97iCKa
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 27, 2023
सुवर्णपदकाचा दावेदार म्हणून नीरज या स्पर्धेत सहभागी झाला होता. आपल्या पहिल्या फेकीमध्ये त्याचा फाऊल झाला. मात्र, दुसऱ्या फेकीमध्ये त्याने 88.17 मीटर इतका लांब भाला फेकत आघाडी घेतली. अखेरपर्यंत त्याने ही आघाडी टिकवून ठेवत सुवर्ण आपल्या नावे केले. एकाच वेळी ऑलिम्पिक व वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो केवळ दुसरा खेळाडू ठरला.
पाकिस्तानचा युवा भालाफेकपटू अर्शद नदीम याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भारताचे आणखी दोन भालाफेकपटू मनू जेना व डीपी मनू अनुक्रमे पाचव्या व सहाव्या क्रमांकावर राहिले.
(Olympic Gold Medalist Neeraj Chopra Won Gold In World Athletics Championship)
महत्वाच्या बातम्या –
‘तो माझ्या नेतृत्वातही खेळला आहे…’, माजी सलामीवीराने वनडेत सूर्यकुमारसाठी सुचवली खास बॅटिंग पोझिशन
BREAKING: स्मृतीची सदर्न ब्रेव्हज बनली ‘द हंड्रेड’ची चॅम्पियन, सुपरचार्जर्सच्या पदरी निराशा