---Advertisement---

‘भारत जोडो’ यात्रेत दिसला विजेंदर सिंगचा स्वॅग! राहुल गांधींनीही मारला मिशीवर ताव

On: शनिवार, नोव्हेंबर 26, 2022 12:08 AM
---Advertisement---

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी मागील काही दिवसांपासून भारत जोडो यात्रा आयोजित केली आहे. कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी असलेली पदयात्रा सध्या मध्य प्रदेशातून जातेय. या यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभत असताना, आता क्रीडा क्षेत्रातील लोकांनी देखील या यात्रेला पाठिंबा दिला आहे. भारताला बॉक्सिंगमध्ये पहिले ऑलिम्पिक मेडल मिळवून देणारा बॉक्सर विजेंदर सिंग हा या यात्रेत सहभागी झाला. तसेच त्याने राहुल गांधी यांच्यासह काही अंतर चालूनही पार केले.

दक्षिण भारतातून सुरू झालेली भारत जोडो यात्रा आता मध्य भारतात येऊन पोहोचली आहे. खरगोन येथे यात्रा आलेली असताना ऑलिम्पिक पदक विजेता तसेच सध्या व्यावसायिक बॉक्सर म्हणून नाव कमावलेला विजेंदर सिंग या यात्रेत सहभागी झाला. तू स्वतः काही किलोमीटर यात्रेत चालताना दिसला. राहुल गांधी यांच्या ट्विटर हँडलवरून तसेच काँग्रेस व विजेंदर सिंग यांच्या सोशल मीडिया हँडलवरून या भेटीची छायाचित्रे पोस्ट केली गेली. राहुल यांनी पोस्ट केलेल्या छायाचित्राला ‘मिशीवर ताव, हातात ताकद, सडेतोड इरादे व उत्साही पावले’ असे कॅप्शन दिले गेले. तर, काँग्रेस तर्फे पोस्ट केलेल्या छायाचित्राला वखरा स्वॅग असे कॅप्शन दिले होते. विजेंदर हा भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणारा पहिलाच प्रमुख क्रीडापटू ठरला आहे. मध्य प्रदेशात बारा दिवस चालल्यानंतर ही यात्रा राजस्थानकडे आगेकूच करेल.

विजेंदरने 2008 बिजिंग ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक आपल्या नावे केले होते. दोन वर्षांपूर्वी तो व्यावसायिक बॉक्सिंगकडे वळाला आहे. तसेच त्याने 2019 लोकसभा निवडणुकीत दिल्ली येथून काँग्रेस पक्षातर्फे नशीब आजमावले होते. मात्र, त्याला पराभवाचा सामना करावा लागलेला.

Olympic Medalist Boxer Vijender Singh Join Bharat Jodo Yatra)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

बालपणीचे प्रशिक्षक म्हणतायेत, ‘शार्दुलला 2023 विश्वचषक खेळवाच”
‘त्यामुळे’ भारत विश्वचषक जिंकत नाहीये! रोहित शर्माच्या प्रशिक्षकांनी सांगितले कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---