पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारतासाठी साधारण होती. भारतीय खेळाडूंनी स्पर्धेत एकूण 6 पदके जिंकली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 117 खेळाडूंनी सहभाग नोंदवले होते. ज्यामध्ये भारताच्या खात्यात एकूण 6 पदके आली, तर 7 व्या पदकाचा निर्णय अजून बाकी आहे. वास्तविक, विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर तिने रौप्य पदकासाठी अपील दाखल केले होते, ज्याचा निर्णय प्रलबिंत आहे. अशाप्रकारे भारताच्या खात्यात एकूण 7 पदके जमा होऊ शकतात.
भारताने 6 पैकी 5 कांस्य आणि 1 रौप्य पदक जिंकले. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. मात्र, यावेळी भारताच्या खात्यात एकही सुवर्ण आले नाही. यापूर्वी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने 1 सुवर्णपदक जिंकले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण 7 पदके जिंकली होती, जी भारताची एका ऑलिम्पिकमधील सर्वोच्च संख्या होती. आता महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या निर्णयामुळे भारताला 7 वे पदक मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पॅरिसमध्ये भारताने या खेळात पदके जिंकली
10 मीटर एअर पिस्तूल- मनू भाकर
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एकेरी स्पर्धेत भारताला पहिले पदक (कांस्य) मिळाले. मनू भाकरने भारतासाठी हे पदक जिंकले होते. मनू भाकरने एकूण दोन पदके जिंकली होती. मनूने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात दुसरे पदक जिंकले. महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात मनूने निराशा केली, जिथे ती चौथ्या स्थानावर राहिली. अशाप्रकारे मनूचे तिसरे पदक हुकले होते.
10 मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ- मनू भाकर आणि सरबज्योत सिंग
भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र (कांस्य) संघात दुसरे पदक मिळाले. भारताला दुसरे पदक मिळवून देणाऱ्या या संघात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचा समावेश होता.
50 मीटर रायफल थ्री पोझीशन- स्वप्नील कुसळे
नेमबाजीत भारताला तिसरे पदक (कांस्य) मिळाले. स्वप्नीलने 50 मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत पदक जिंकणारा स्वप्नील पहिला भारतीय ठरला.
हॉकी संघ
भारतीय हॉकी संघाने कांस्यपदकही पटकावले. हॉकी संघाने भारताच्या खात्यात चौथे पदक जमा केले. कांस्यपदकाच्या लढतीत हॉकी संघाने स्पेनचा 2-1 असा पराभव केला होता.
भालाफेक- नीरज चोप्रा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भारताला पाचवे पदक मिळवून दिले होते. नीरजने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. यापूर्वी नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
कुस्ती- अमन सेहरावत
भारताच्या खात्यात सहावे पदक पुरुष कुस्तीपटू अमन सहरवतने पटकावले. अमनने कुस्तीच्या 57 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते.
ऑलिम्पिकमध्ये भारताची सर्वोत्तम कामगिरी
– टोकियो 2020 मध्ये 7 पदके
– पॅरिस 2024 मध्ये 6* पदके
– लंडन 2012 मध्ये 6 पदके
हेही वाचा-
विनेश फोगटच्या अपात्रेबाबत मोठं अपडेट समोर, या दिवशी होणार अंतिम निर्णय
“आयपीएलचा हा नियम मूर्खपणाचा, याला रद्द करा”, अश्विननं काढली लक्तरं
ढोल-ताशा आणि डान्स, भारतीय हॉकी संघाचं मायदेशात अश्या पध्दतीनं स्वागत! पाहा VIDEO