आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग टू 2023-2027 चे आयोजन केले जात आहे. ज्यामध्ये बुधवारी (24 जुलै) नामिबिया आणि ओमान यांच्यात सामना झाला. या रोमहर्षक लढतीत ओमानने 4 गडी राखून विजयाची नोंद केली. या सामन्यात बिलाल खानने ओमानसाठी घातक गोलंदाजी केली. आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह सर्व महान खेळाडूंना मागे टाकले. बिलाल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेण्याचा विक्रम नेपाळचा गोलंदाज संदीप लामिछानेच्या नावावर आहे. त्याने 42 सामन्यात 100 विकेट घेतल्या. तर अफगाणिस्तानचा राशिद खान दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 44 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. बिलाल खान तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. बिलालने 49 सामन्यांमध्ये 100 एकदिवसीय विकेट्स घेतल्या आहेत. शाहीन आफ्रिदी चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 51 सामन्यात 100 बळी घेतले आहेत.
वेगवान गोलंदाजांच्या यादीत बिलाल पहिल्या क्रमांकावर आहे. या प्रकरणात बुमराह आणि शाहीनसह अनेक गोलंदाज मागे राहिले आहेत. बिलालने नामिबियाविरुद्ध 10 षटकांत 50 धावांत 3 बळी घेतले. त्याने 1 निर्धाव षटक देखील टाकली.
Record alert! 🚨
Bilal Khan becomes the quickest to 100 ODI wickets amongst fast bowlers and third overall ⚡️#CWCL2 #OMAvNAM pic.twitter.com/ymEJECCmO2
— ICC (@ICC) July 24, 2024
ओमानचा गोलंदाज बिलाल खानची आतापर्यंतची कारकीर्द बघितली तर ती चांगली राहिली आहे. त्याने 49 सामन्यात 101 विकेट घेतल्या आहेत. ज्यामध्ये एका सामन्यात 31 धावांत 5 बळी घेणे ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. बिलालने 78 टी20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 110 विकेट्स घेतल्या आहेत. बिलालची या फॉरमॅटमधील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 19 धावांत 4 विकेट्स घेणे.
ओमान आणि नामिबिया यांच्यातील सामना रोमांचक होता. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने 50 षटकांत 9 गडी गमावून 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात ओमानने 49.1 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठले.
हेही वाचा-
घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचा यू-टर्न? नताशाच्या पोस्टवर केले हृदय जिंकणारे काम, प्रतिक्रिया झाली व्हायरल
जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवणारा ‘किंग’ कोहली रचणार इतिहास?
“सीएसकेकडून खेळणे देवाने दिलेली भेट आहे” संघात निवड झाल्यानंतर श्रीलंकन खेळाडू भावूक